दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#ब्रेकफास्ट
आज 100वी रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. या वेळेची मी खूप वाट पाहत होते. थँक यू कूक पॅड टीम, थँक यू वर्षा मॅम. साप्ताहिक ब्रेकफास्ट रविवारची रेसिपी दडपे पोहे आहे. जी आज मी बनवली आहे.ही रेसिपी पारंपारिक, अतिशय सोपी, पौष्टिक, चवदार, झटपट होणारी आणि डायट साठी योग्य तसेच इंधन बचत करणारी आहे. अशी ही कोकणी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनिटे
2जणांसाठी
  1. 2 कपपातळ पोहे
  2. 1 कपकीसलेले ओले खोबरे
  3. 1कांदा
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 1 टेबलस्पूनजिरें
  6. 1/2 टेबलस्पूनहिंग
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  10. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनहिंग
  13. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

5मिनिटे
  1. 1

    पोहे चाळून स्वच्छ करून घ्यावे. नारळ किसून घ्यावा. कांदा मिरची कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी.

  2. 2

    एका बाउल मध्ये पोहे घेऊन. त्यात खोबरे, कांदा, मिरची कोथिंबीर लिंबाचा रस, साखर मीठ घालून सर्व मिक्स करावे.

  3. 3

    गॅसवर फोडणी पात्रात थोडे तेल घेऊन त्यात शेंगदाणे परतुन ते पोह्याच्या मिश्रणात घालावे.

  4. 4

    परत फोडणी पात्रात तेल घालून जिरें व हिंगाची फोडणी करून ती पोह्यावर ओतावी. झाकण ठेऊन पोहे दडपून ठेवावे म्हणजे फोडणीचा वास त्यात राहतो. हे पोहे दडपून ठेवतात म्हणून त्याला दडपे पोहे म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes