दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ब्रेकफास्ट
#दडपे पोहे
ब्रेकफास्टमधील माझी सहावी रेसिपी मी आज पाठवत आहे.
नाश्त्यामध्ये पोहे हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कांदा पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार बनवण्यात गृहिणी आपले कौशल्य पणाला लावतात. यासारखाच दडपे पोहे हा अत्यंत रूचकर आणि सर्वांचाच आवडता , पौष्टीक पदार्थ.मीही आज दडपे पोहे केले , खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५-४० मि.
४-५ लोकांसाठी
  1. 2मोठे वाटी पोहे (कांदा पोह्याचे)
  2. 1मोठा कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 5-6हिरव्या मिरच्या
  5. 1मोठी वाटी खोवलेले खोबरे
  6. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1 लहानवाटी हिरवा वाटाणा
  8. 1 लहानवाटी स्विटकाॅर्न
  9. 2 चमचेसाखर
  10. अर्धे लिंबू
  11. 1फुलपात्र नारळाचे पाणी
  12. मीठ चवीनुसार
  13. हिंग, जीरे , मोहरी, कडीपत्ता, हळद फोडणीसाठी

कुकिंग सूचना

३५-४० मि.
  1. 1

    साहित्य

  2. 2

    प्रथम कांदा, कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरून घेणे. एका मोठ्या पातेल्यात पोहे घ्यावेत त्यावर कांदा, टोमॅटो, खोबरे, मीठ, साखर, नारळाचे पाणी, लिंबू पिळून सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित हलवावे.

  3. 3
  4. 4

    नंतर हाताने दाबून ठेवावे. म्हणजेच दडपून ठेवावेत.जेवढे जास्तवेळ रहातील तेवढे पोहे छान भिजतात. मऊ होतात. तरी किमान एक ते दोन तास तरी ठेवावेत.

  5. 5

    व्यवस्थित भिजल्यानंतर खायला घ्यायच्यावेळी फोडणी करावी. तव्यात ३-४ चमचे तेल गरम करावे. तापले की प्रथम शेंगदाणे तळून घ्यावेत. नंतर त्यामध्ये हिंग, जीरे, मोहरी, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी, तडतडले की वाटाणा व काॅर्न घालावेत. २ मि. हलवावे. हळद घालावी.

  6. 6
  7. 7

    ही फोडणी पोह्यांवर घालून सावकाश हलवावे. फोडणी सर्व पोह्यांना व्यवस्थित लागली पाहिजे.

  8. 8

    एकदा चव पहावी, मीठ, तिखट पाहून अॅड करावे. सर्व्ह करताना डिशमध्ये पोहे काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

Similar Recipes