ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

हिवाळ्यात आवळे, ओली हळद पाहायला मिळते. आपण रोजच्या जेवनामध्ये हळद वापरतो. ती औषधी ही आहे. अशा या बहुगुणी ओल्या हळदीचे मी लोणचे तयार केले आहे. चला पाहुयात रेसिपी.

ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

हिवाळ्यात आवळे, ओली हळद पाहायला मिळते. आपण रोजच्या जेवनामध्ये हळद वापरतो. ती औषधी ही आहे. अशा या बहुगुणी ओल्या हळदीचे मी लोणचे तयार केले आहे. चला पाहुयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामओली हळद
  2. 4-5 टेबलस्पूनतेल (कमी जास्त करू शकता)
  3. चवीनुसारमीठ
  4. चवीनुसारलालतिखट (ऑपशनल आहे)
  5. 2टिस्पून मोहरी
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 4 टेबलस्पूनलिंबू लोणचे मसाला(बेडेकर लिंबू लोणचे मसाला) आवडीनुसार घेणे
  8. 3-4लिंबू रस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम ओली हळद स्वच्छ धून सुती कपडाने ती कोरडी करून घेणे. आता त्याचे सॅलरीने वरची साले काढून घेणे.

  2. 2

    आता ही हळद एका प्लेट मध्ये खिसणीने खिसुन घेणे. व ती एका बाउल मध्ये घेणे. आता त्या मध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार लिंबू लोणचे मसाला, आणि तिखट हवे असेल तर लाल तिखट ही घालू शकता.

  3. 3

    आता या मध्ये 3-4 लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण हलवून घेणे. लिंबू मुळे रस ही सुटतो आणि चटपटीत टेस्टी लागते. आता एका छोटया कढई मध्ये 5 मोठे चमचे फोडणीसाठी तेल घेणे. ते गरम झाले कि त्या मध्ये मोहरी व हिंग घालून घेणे.फोडणी खमंग झाली कि गॅस बंद करणे.

  4. 4

    फोडणी थंड झाली कि त्या मिश्रानावर ओतावी. व ते लोणचे छान एकजीव करून घेणे.व हवा बंद काचेच्या बाटली मध्ये भरून ठेवावे. फ्रिज मध्ये ठेवावे. बाहेर ही 8 दिवस राहते. (तेलाचे प्रमाण कमी असेल तर बाहेर न ठेवता फ्रिज मध्ये ठेवावे. मस्त महिनाभर टिकते)

  5. 5

    मस्त टेस्टी असे जिभेला चव येणारे चटपटीत लोणचे तयार झाले. रोजच्या जेवनामध्ये वेगवेगळे लोणचे, चटण्या तोंडी लावायला आवडतात त्या मध्ये हे लोणचे ही खूप आवळा लोणचे सारखे टेस्टी चटपटीत लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes