ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB10 #W10
हल्दीका उबटन लगाऊँ तुम्हे....
तेरी काया को कंचनसा निखाँरु...
विकोटर्मरिकच्या या जाहिरातीत हळद लावतानाचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय का?सौंदर्यप्रसाधनामध्ये,औषधांमध्ये पूर्वापार वापर होत असणारी हळद हे एक उत्तम antioxidant, anti imphlametory आहे.आपल्या हिंदू संस्कृती मध्ये हळदीचा पूजे मध्ये अग्रस्थानी मान आहे.देवा पुढे ठेवल्या जाणाऱ्या विड्यामध्ये सुपारी,हळकुंड हे असतेच.ओटी भरतानाही लेकुरवाळं हळकुंड जरुर घातले जाते.हळदीचे कोंब किंवा फुटवे असतात त्याला लेकुरवाळं हळकुंड म्हणतात,म्हणजे तशीच वंशवृद्धी त्या सुवासिनीची व्हावी हा त्यातला अर्थ!ही ओली हळद वाळली की हळकुंड तयार होतं.इकडे सातारा-वाई,सांगलीला हळदीची शेती भरपूर आहे.अतिशय उत्तम प्रतीची हळद इथे पिकते.लग्नाचा मुहुर्तही सुपारी बरोबर हळकुंड फोडूनच होतो.हळदीला सोन्यासारखे तेज असते.लग्नामध्ये हळद लावणे हा मोठा सोहळाच असतो.सध्याच्या करोनाच्या काळात हळद घालून पाणी पिण्यानेही इम्युनिटी भरपूर वाढते.रोजच्या भाजी,आमटीला तर हळदीशिवाय लज्जतच नाही.कुठे कापलं,रक्त वाहु लागलं तर हळद ही हाताशी हवीच!
हिवाळ्यात ओली हळद भाजीमंडईत सर्वत्र दिसू लागते.ओल्या हळदीचं लोणचं अगदी पारंपारिक आहे.ओली हळदही आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी युक्त थोडी कडवट,तुरट चवीची,उष्ण असते.आजची ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी अशीच रसरशीत,लज्जतदार....चटकदार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5-6व्यक्ती
  1. 250 ग्रॅमओली हळद
  2. 25 ग्रॅमआले
  3. 10-12मध्यम तिखट हिरव्या मिरच्या
  4. 2.5 टीस्पूनमोहरीची डाळ
  5. 2 टीस्पूनब्याडगी मिरची तिखट
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 12-15मीरे
  8. 3-4 टीस्पूनमीठ किंवा आवडीप्रमाणे
  9. 1/2 वाटीबारीक चिरलेला गूळ
  10. 5-6लिंबांचा रस
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 2-2.5 वाट्यागोडेतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    ओली हळद मंडईतून आणली की पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.फडक्यावर कोरडी करुन सुकवून घ्यावी.नंतर याची सोलाण्याने साले काढून घ्यावीत.याचप्रमाणे आल्याचीही साले काढावीत.
    वरील प्रमाणानुसार ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची तयारी करुन घ्यावी.

  2. 2

    आता हळद,आले किसणीवर किसून घ्यावे.मिरच्यांचे बारीक तुकडे करुन घ्यावेत.लिंबं चिरावीत.मोहरीची डाळ कोमटसर भाजून घ्यावी व पूड करावी.

  3. 3

    लिंबांचा रस काढून घ्यावा.रस गाळून लिंबातील बिया पूर्णपणे काढून टाकाव्यात.या रसात मोहरी डाळीची पूड घालून मिक्सरवर 2-3मिनिटे फेटून घ्यावे.मस्त नाकात जाणारा उग्र दर्प आला की मोहरी फेटली समजावे.

  4. 4

    आता किसलेली ओली हळद,आले व मिरचीचे तुकडे एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये घालावे. त्यावर ब्याडगी मिरची तिखट,मीठ घालावे व हलवावे.हळद तुरट,कडवट चवीची असल्याने यात थोडा गूळ चिरुन घालावा.छान चव येते.सर्व मिश्रण एकजीव करावे.

  5. 5

    या मिश्रणात लिंबाच्या रसात फेटलेली मोहरी घालावी.व मिश्रण एकजीव करावे. व 4-5तास झाकून ठेवावे.

  6. 6

    कढईत तेल कडकडीत तापवून मोहरी,हिंग,मीरे याची फोडणी करावी.फोडणी पूर्ण थंड होऊ द्यावी.व या लोणच्यावर घालावी.थोडा थोडा खार सुटतो.दोन दिवसातच मुरलेले मस्त असे ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे!👍 भाजणीच्या थालिपीठाबरोबर मस्त लागते.तसंच एरवीही तोंडी लावणे म्हणून वाढू शकता.😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes