साधी घडीची पोळी/चपाती (रोटी) (chapati recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #Week25 #Roti

गोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी

साधी घडीची पोळी/चपाती (रोटी) (chapati recipe in marathi)

#GA4 #Week25 #Roti

गोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 पोळी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. मीठ चवीनुसार
  4. आवश्यकतेनुसार पाणी मळण्या करिता
  5. आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप पोळी वर लावण्यासाठी
  6. आवश्यकतेनुसार थोडे कोरडे पीठ लाटताना

कुकिंग सूचना

  1. 1

    पीठ, तेल, मीठ एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. मळून घेतलेलं पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे. साधारण 15-20 मिनिटे झाकण घालून कणीक मुरू घ्या.

  2. 2

    पिठाचा बेताचा आकाराचे गोळे करून घ्या.
    थोडे सुके पीठ पसरून गोळा थोडा लाटून घ्या. नंतर त्यावर थोडेसे तेल लावा. तेलावर थोडीशी पिठी लावून, तिची अर्धी घडी घाला.

  3. 3

    ह्या घडीवरही पुन्हा थोडे तेल व पिठी लावून पुन्हा त्याची घडी घाला.
    ह्या प्रकारे सर्व कणकेचे गोळे घडी घालून घ्या.

  4. 4

    नंतर पोळपाट वर ही घडी घातलेली पोळी, थोडे कोरडे पीठ घेऊन गोलाकारात लाटून घ्या.

  5. 5

    लाटताना उलटून पुन्हा लाटावी म्हणजे दोन्हीकडचे पदर सारखे पातळ लाटले जातात.

  6. 6

    तापलेल्या तव्यावर सावकाश पोळी टाकून थोड्या वेळाने पोळी जरा सरकवून गोल फिरवून ती नंतर उलटावी. पोळी चांगली फुगली, की तव्यावरच कडेने दाब द्या.

  7. 7
  8. 8

    नंतर पुन्हा एकदा उलटून दूस-या बाजूने शेकून प्लेट मध्ये काढून लगेच तूप किंवा तेल लावा.

  9. 9

    साधारण 2-3 मिनिटे चपात्या गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes