कुरकुरीत पापलेट फ्राय (kurkurit Paplet fry recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा तुम्ही स्वतः करून पहा.
#AV

कुरकुरीत पापलेट फ्राय (kurkurit Paplet fry recipe in marathi)

माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा तुम्ही स्वतः करून पहा.
#AV

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७  ते ८ मिनिटे
४ ते ५ लोकांसाठी
  1. 4मध्यम आकाराचे पापलेट
  2. 2 चमचेबारीक रवा
  3. 2 चमचेतांदळाचे पीठ
  4. चवीनुसारमीठ
  5. चिमूटभरहळद
  6. 1लिंबू
  7. 1.5 चमचा लाल तिखट मसाला
  8. सजावटी साठी कोथिंबीर
  9. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

७  ते ८ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम पापलेट स्वच्छ धुवून त्याचे ३ समान तुकडे करून घेणे, शेपटीचा भाग मोठा ठेवणे व डोक्याचा भाग ही फ्राय साठी घेणे. (कुरकुरी छान लागलो.) नंतर त्यात एक लिंबू पिळून, लाल तिखट मसाला, चवीपुरतं मीठ व हळद टाकून बाजूला निदान अर्धा तास ठेवणे

  2. 2

    त्यानंतर मंद आचेवर तवा ठेवणे व त्यात ४ चमचे तेल टाकून तेल थोडं गरम झाल्यावर तांदळाचे पीठ व बारीक रवा सम प्रमाणात घेणे व माश्याचे एक - एक तुकडे त्यापिठाला लावून व मासे दाबून एक एक तुकडा तव्यावर सोडणे.

  3. 3

    दोन मिनिट नंतर मासे परतवणे व उलट्या बाजूने फ्राय करून घेणे व नंतर एका ताटात टीशु पेपर वर एक एक मासा काढणे. कुरकुरीत असे पापलेट खाण्यासाठी तयार. वरतून कापलेली बारीक कोथिंबीर शिवरणे.
    (कोणत्या ही माश्याचा डोक्याकडील भाग खाल्ला तर स्मरणशक्ती व नेत्रदृष्टी ही वाढते.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes