मसाले भात (masale bhaat recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक
Week 4
महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
3 माणसे
  1. 1 कपतांंदूूूळ
  2. हिरवं वाटण
  3. 1 मोठा चमचाआलं लसूण पेस्ट
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 वाटीकोथिंबीर
  6. मसाला वाटण
  7. 2तमालपत्र
  8. १/४ वाटी सुकं खोबरं
  9. 3-4लवंगा
  10. 1दालचिनीचा तुकडा
  11. १०-१२ मिरीचे दाणे
  12. 3-4सुक्या लाल मिरच्या
  13. 1 मोठा चमचाजीरं
  14. 1/4 वाटीधणे
  15. 1हिरवी वेलची
  16. 1मसाला वेलची
  17. 1चक्री फूल
  18. 1/4 वाटीकोथिंबीर
  19. 1/4 वाटीकिसलेले ओलं खोबरं
  20. 1 चमचातूप
  21. फोडणी
  22. 1 मोठा चमचातेल
  23. 2तमालपत्र
  24. १०-१२ कडिपत्त्याची पानं
  25. 1/2 टिस्पून हिंग
  26. इतर साहित्य
  27. 1 चमचाहळद
  28. 1 चमचागरम मसाला पावडर
  29. १०-१२ काजू
  30. 1/4 वाटीशेंगदाणे
  31. चवीनुसारमीठ
  32. 2 कपगरम पाणी
  33. भाज्या
  34. 1/4 कपगाजराचे तुकडे उभे चिरून
  35. 1बटाटा
  36. 1वांगं
  37. 1/4 कपतोंडली उभी चिरून
  38. 1/२ कप मटारचे दाणे

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व भाज्या चिरून घ्या. तोंडली,गाजर आणि वांग्याचे लांब तुकडे करा. बटाटा चिरून घ्या. हिरवं वाटण करून घ्या. लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि २ हिरव्या मिरच्या वाटून घ्या.

  2. 2

    एका तव्यावर सर्व खडे मसाले कोरडे भाजून घ्या. सुकं खोबरं, लाल मिरच्या भाजून भाजा. थंड झाल्यावर मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटताना पाणी अजिबात घालू नका. उरलेला मसाला आपल्याला परत जास्त दिवस वापरता येतो. आता आपले दोन्ही मसाले तयार झाले. तांदूळ धूवून ठेवा.

  3. 3

    मसाले तयार झाले कि भात करायला घ्या. तांदूळ धुवून घ्या.

  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करा. तेल तापले की फोडणीत २ तमालपत्रे टाका. कडिपत्त्याची पानं टाकून परतून घ्या. गाजर, तोंडली टाका. हिंग टाकून परतून घ्या.

  5. 5

    पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर २ तमालपत्रे, कडिपत्याची पाने टाकून परतून घ्या. गाजर, तोंडली टाका. हिंग टाकून परतून घ्या. बटाटे,वांगी टाका

  6. 6

    हिरवं वाटण टाकून मिक्स करून घ्या. मटार टाकून १ मिनट शिजवून घ्या.

  7. 7

    एक मिनटाने झाकण काढून परत परतून घ्या. आता २ मोठे चमचे वाटलेला लाल मसाला घाला. बेतानेच घाला कारण हिरव्या वाटणामध्ये मिरच्या घातल्या आहेत. मसाला चांगला मिक्स झाला कि तांंदूळ घालून चांगले मिक्स करा. तांदूळ आंबेमोहोर किंवा बासमती पण चालेल. एक चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून परतून घ्या. काजू आणि शेंगदाणे घाला. मिक्स करून घ्या.

  8. 8

    दोन कप गरम पाणी घालून चवीनुसार मीठ टाका. दहा मिनिटे शिजवा. दहा मिनिटाने झाकण काढल्यावर भात कोरडा वाटल्यास थोडे पाणी गरम करून घाला. मग नंतर पॅन एका जाळीवर किंवा तव्यावर ठेवून दहा मिनिटे शिजवून घ्या.

  9. 9

    भात शिजल्यावर एक चमचा तूप टाका. कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes