पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
#पुरणपोळी
पुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले.
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
#पुरणपोळी
पुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले.
कुकिंग सूचना
- 1
पुरणपोळी बनविण्यासाठी चना डाळ स्वच्छ धुऊन, प्रेशर कुकर मध्ये मऊ शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी काढून घ्यावे. आणि रविने डाळ घोळून घ्यावी. जितकी डाळ असेल तितक्याच प्रमाणात गूळ घालावा. आणि पुरण पाकास येईपर्यंत शिजवून घ्यावे.
- 2
पुरण तयार झाले की, त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालावी. आणि पूरण, पुरण यंत्रामधून बारीक करून घ्यावे.
- 3
पुरणाचे आवरण तयार करण्यासाठी, कणीक चाळून त्यामध्ये किंचित मीठ आणि तेलाची किंवा तुपाचे मोहन घालून कणिक मळून घ्यावी. आणि त्याचा गोळा तयार करून घ्यावा.
- 4
कणिक मुरल्यानंतर आणि पुरण थंड झाल्यानंतर पुरणाची पोळी लाटायला घ्यावी. प्रथम एक छोटासा गोळा घेऊन छोटीशी पुरी लाटावी. त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवावा. आणि गोळ्या पूर्ण कणकेने पॅक करावा.
- 5
या गोळ्याची पोळी लाटून घ्यावी. गॅसवर मंद आचेवर तवा ठेवावा. या तव्यावर पुरणाची पोळी एका बाजूने शेकून घ्यावी.
- 6
नंतर दुसऱ्या बाजूने शेकतांना तेल किंवा तूप घालुन पुरणपोळी दोन्ही बाजूने खरपूस तांबूस रंगाची शेकून घ्यावी.
- 7
तयार आहे आपली गरमागरम साजूक तुपाने शेकलेली, पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी. साजूक तुपाबरोबर ही पुरणपोळी खायला खूप छान वाटते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी साखर गुळाची (sakharechi puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. याशिवाय नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. Vandana Shelar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैत्रिणींनो , पुरणपोळी म्हटले की सगळ्यात मोठा पाहुणचार समजला जातो विदर्भात ...त्यामुळे खास पाहुणे आले की पुरणपोळीचा पाहुणचार हवाच..आपल्या खास पाहुण्यासाठी, बाप्पासाठी पुरणाचा पाहुणचार हवाच....मग पुरणपोळी असो की पुरणाचे मोदक....त्यामुळे आज मी विदर्भात केल्या जाणाऱ्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखविणार आहे बाप्पाला ! Varsha Ingole Bele -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण पुरणपोळी शिवाय पूर्ण होत नाही, तर चला मग बघुया रेसिपी Pallavi Maudekar Parate -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी#HSRHOLI RECIPESहोळी रे होळी पुरणाची पोळी....होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पुरण पोळी बनवू शकता, मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी! Vandana Shelar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मी ह्या वर्षी गौरी साठी गावी गेले नाही म्हणून घरीच त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देवाला दाखवला.. Mansi Patwari -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post1संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते. Shilpa Limbkar -
होळी स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#पुरणपोळी#holiमहाराष्ट्राची प्रमुख सिग्नेचर गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजेच पुरणपोळी वर्षभराची कोणतेही सण वार असो पुरणपोळी लाच सर्वात जास्त मान असतो कुटुंब एकत्र आले तर पुरणपोळीचा घाट असतो आनंद ,प्रेम, तृप्तता अशा सर्व गुणांनी ही पुरणपोळी सर्वांमध्ये गोडवा निर्माण करते महाराष्ट्राचे मुख्य दोन सण पोळा आणि होळी या सणांमध्ये पुरणपोळी ही सर्व घरातून बनवली जाते मला माझ्या लहानपणाची पहिली पुरणपोळी आठवते ती काळा कलर च्या मातीचा खापरे वर तयार केलेली खापर पुरणपोळी माझ्या गावात मी लहानपणापासून खाल्लेली आहे आमच्या घरात खापर पुरण पोळी बनवायला बऱ्याच बायका यायच्या इतक्या साऱ्या पुरणपोळ्या बनवायच्या आणि आमच्याकडे बरेच पाहुणे जेवायला यायचे त्यामुळे मी जर खाल्लेली पहिली पोळी खाल्ली असेल तर ती खापर पोळी आहे. आजही आई आमच्यासाठी पोळी बोलून बनवून घेते. पोळी बरोबर भरपूर तूप कटाची आमटी, कुरडया ,भजे असे मेनू असायचाच मला ही लहानपणापासून जे बघितले त्याची सवय लागली आहे म्हणून मी हेच पदार्थ सणावाराला बनवते बऱ्याच भागात तुरीच्या डाळीपासून पुरण बनवले जाते मी बनवलेली पुरणपोळी चे पुरण मी ज्या गाळणीतून पुरण घासून काढले ते अधिक मासात दिलेले वान आहे तिने Chetana Bhojak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळीआंब्याचा सीजन किंवा पाहुणचार म्हटला की खान्देशात हमकास बनवली जाती ती डाळ आणि गुळ घातलेली पुराण पोळी. चूल आणि खापरेवरीची पुरणपोळी खायची मज्जाच काही वेगळी आहे. पण जर खापर नसेल तर आपण तव्यावरही छान पुरणपोळी बनवू शकतो. Deveshri Bagul -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11विदर्भ असो किंवा महाराष्ट्र गोड पाहुणचारामध्ये पुरणपोळीचा पाहुणचार मोठा समजला जातो. तसेच नैवेद्यामध्येसुद्धा पुरणपोळीच्या नैवेद्याला खूप महत्व आहे. तेव्हा अशी प्रसिद्ध असणारी पुरणपोळी मला सुद्धा खूप आवडते. आणि हो आपली पुरणपोळी परदेशात सुद्धा तेवढीच फेमस आहे बरं का ! चला मग बघुयात कशी करतात ती.😊 Shweta Amle -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पुरणपोळी रेसिपी (puran poli recipe in marathi)
#hrपुरणपोळीला महाराष्ट्रत महत्त्वाचा गोड खाद्यपदार्थ मानला जातो. होळीच्या दिवशी देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवितात तसेच होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते nilam jadhav -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा नैवेद्य अनेक पूजा कार्याला बनवतात Deepali Amin -
पुरणपोळी(puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट1महाराष्ट्रात मोठ्या सणावाराला आवर्जून केला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य Arya Paradkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrमहाराष्ट्रीय सण म्हटले की ते पुरणपोळी शिवाय साजरे होतच नाहीत. पूजा , नैवेद्य दाखवायला पुरण पोळी प्रत्येक घरी करतातच. Priya Lekurwale -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! आमच्या कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. होळीच्या निमित्ताने ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक गावागावामध्ये फिरताना ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साकडे घातले जाते.पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. चला तर मग मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी बघूया.😊 Sanskruti Gaonkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीगौरीचा महानैवेद्यासाठी पंचपक्वान्न तर केले जातातच पण पुरणपोळी शिवाय नैवद्य अपुर्णच मानला जातो🙏🙏. निगुतीने शिजवलेले पुरण आणि सैलसर कणकेत पुरण शिगोशिग भरून मऊसुत पोळी वरून तुपाची धार आणि दुध म्हणजे ब्रह्मानंद😋 Anjali Muley Panse -
इंस्टट बेसन पुरणपोळी (besan puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीपुरणपोळी खायला जितकी चांगली तितकीच वेळ खाउ व भरपूर घाट घातला जातो दाळ शिजवून वाटून आटून दळून आशी मोठी प्रोसोस आहे पण अचानक पुरणपोळी तयार करणे शक्य नाही कारण पुवँ तयारी करावी लागते पण मला ईतकी प्रोसेस करण्यासाठी वेळ नव्हता पण नैवेद्य दाखवायचा होता पूजा तर सुरू झाली आता काय करायचं असा प्रश्न पडला होता तेव्हा त्याला एक पयाँय शोधला गेला हरभरा डाळ ऐवजी बेसन वापरले तर पटकन होईल असे केले तर करून तर बघू लागलो कामाला सुरुवात केली आणि पहाता पहाता पुरण रेडी खरच एक परिक्षा पास झाल्यावर जसा आनंद होतो ना तसे काही झाले माझे पण गंमत म्हणजे कशी झाली असेल हा भाग होताच पुढे नैवेद्य दाखवून जेवणासाठी जेव्हा दिली पुरणपोळी खुप छान खरपूस झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आणि माझा जिवात जिव आलासहसा असे कधी झाले नव्हते पण या कारणाने मला ऐनवेळी पण पुरणपोळी तयार होते ती पण 20 मिनिटामध्ये हे समझले म्हणून प्रयत्न केला की काही ही शक्य आहे असे लक्षात आले तुम्ही नक्कीच एकदा तरी करुन बघा Nisha Pawar -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा आणि पुरणपोळी हे पश्चिम महाराष्ट्राच एक समीकरणच आहे नवीन वर्षाचा आगमन हे गोड-धोड करून करा राव व ही प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे पुरणपोळी म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाक आलाच. Supriya Devkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आहे. होळी,गुढीपाडवा,लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो.... देवाला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरण या महाराष्ट्रात बसले असावे असे म्हटले जाते.Sheetal Talekar
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल चॅलेंज रेसिपी होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रात व प्रत्येक मराठी माणसाच्या घरात होळीला पुरणपोळी केली जाते तसेच साजुक तुप कटाची आमटी कुरडई पापडी भजी भाजी भाताचा नैवेद्य होळीला दाखवला जातो चला तर पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या