दाल मखनी (daal makhani recipe in marathi)

Kishori Tamboli
Kishori Tamboli @cook_27649372

#GA4 #Week 17#Keyword Dal Makhani

दाल मखनी (daal makhani recipe in marathi)

#GA4 #Week 17#Keyword Dal Makhani

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 ते 45 मिनिटे
तीन व्यक्तींसाठी
  1. 100 ग्रॅमभिजवलेली काळी उडीद व हरभरा डाळ किंवा राजमा(मिक्स)
  2. 1मोठा कांदाा (बारीक चिरलेला)
  3. 1टोमॅटो (बारीक चिरलेलाा)
  4. 1 टीस्पूनआले लसून पेस्ट
  5. 4 टीस्पूनसाजूक तूप
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  8. 8-10कढीपत्त्याची पाने
  9. 1 टीस्पूनमीठ (चवीनुसार)
  10. प्रत्येकी1 टी स्पून गरम मसाला व तिखट
  11. 3-4 टीस्पून घरचे ताजे लोणी किंवा बटर
  12. 1/2 टीस्पूनहळद व हिंग
  13. 1-2 टिस्पून सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

40 ते 45 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण दाल मखनी साठी लागणारी सर्व तयारी एका ट्रे मध्ये करून घ्यावी. तसेच कुकर मध्ये सात ते आठ तास भिजवलेली उडदाची डाळ व हरभऱ्याची डाळ (सहा ते सात शिट्ट्या)एकजीव होईपर्यंत शिजवावी.

  2. 2

    हे कढईत तूप गरम करून घ्यावे. तूप गरम झाल्यानंतर त्यात जीरे हिंग व हळद घालून फोडणी करावी. त्यानंतर त्यात कढीपत्ता व मिरची घालून फोडणी तडतडू द्यावी. नंतर त्यात कांदा व लसूण घालून हे मिश्रण लाल होईपर्यंत परतावे. आता त्या मिश्रणात चिरलेला टोमॅटो घालावा. कढईवर एक छोटी बाटली पालखी घालून एक वाफ काढावी. वाफ आल्यानंतर त्या मिश्रणात गरम मसाला तिखट व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे

  3. 3

    आता या मिश्रणात शिजवलेली डाळ घालून एकत्र ढवळून घ्यावे. आपल्या आवडीनुसार ही डाळ घट्ट किंवा पातळ करावी. त्यानंतर एका छोट्या लोखंडी कढईत लोणी वितळवून थोडे गरम करून घ्यावे व या डाळीमध्ये घालून हे मिश्रण एकत्र करावे. दाल मखनी सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून कोथिंबीर व थोडेसे लोणी घालून सर्व्ह करावी.

  4. 4

    अशीही दाल मखनी गरम गरम पराठ्याबरोबर अतिशय चविष्ट व रुचकर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kishori Tamboli
Kishori Tamboli @cook_27649372
रोजी

Similar Recipes