खरबूज पुदिना मिल्कशेक (kharbuj pudina milkshake recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#मिल्कशेक # उन्हं वाढायला लागली की थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. अशावेळी या दिवसात मिळणाऱ्या, वेगवेगळ्या फळांचे, रस, मिल्कशेक बनविल्या जातात. मी ही आज असेच, खरबूज मिल्कशेक तयार केले. सोबत चवीसाठी पुदिन्याचा वापर केला.. छान चव येते त्याने मिल्कशेक ला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/2 कपखरबूज फोडी
  2. 1/2 लिटरदूध
  3. 1/4 कपसाखर किंवा चवीप्रमाणे
  4. चिमुटभरमीठ
  5. 10-12पुदिन्याची पाने
  6. बर्फ
  7. सुकामेवा काप

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    खरबूज चिरून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. दूध गरम करून, फ्रीजमध्ये थंड करून घ्यावे.

  2. 2

    मिक्सर चे भांडे घेऊन त्यात खरबूज फोडी आणि बर्फ टाकाव्यात. फिरवून घ्यावे. त्यानंतर त्यात पुदिना, मीठ टाकावे.

  3. 3

    साखर टाकावी आणि चांगले फिरवून घ्यावे. नंतर त्यात साई सह दूध टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे. अशाप्रकारे झटपट मिल्कशेक तयार आहे.

  4. 4

    आता सर्व करताना, काचेच्या ग्लास मध्ये बर्फ टाकून नंतर त्यात मिल्क शेक टाकावे. वरून सुकामेवा काप घालावेत. आणि थंडगार सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes