क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#soupsnap
#Ranjana Mali
# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप
मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏

क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)

#soupsnap
#Ranjana Mali
# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप
मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3-4लाल टोमॅटो
  2. 1कांदा
  3. 1गाजर
  4. 1तमालपत्र
  5. 2-3लवंग
  6. 3-4मिरे
  7. 4-5लसूण पाकळ्या
  8. 1 इंचआले
  9. 1/2 टीस्पूनमिरपूड
  10. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  11. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  12. 1-2 टीस्पूनबटर
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    प्रथम टोमॅटो, गाजर, कांदा चिरून घेणे. आता गॅस वर पातेले ठेवून त्या मध्ये बटर घालावे. बटर वितळले कि त्यात तमाल पत्र, लवंग, मिरे घालून परतावे.आता त्या मध्ये कांदा, लसूण, आले घालावे.

  2. 2

    2 मिनिटे परतून घेणे. आता या मध्ये गाजर, टोमॅटो घालून 3-4 मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

  3. 3

    10 मिनिट टोमॅटो शिजवून घेणे नंतर थंड झाला कि मिक्सर पॉट मध्ये घेऊन बारीक पेस्ट करून घेणे. आता ही पेस्ट थोडे गरजे प्रमाणे पाणी घालून गाळणीने गाळून घेणे.

  4. 4

    आता गॅस हे पातेले ठेवून छान सूप ला 5 मिनिटे उकळी काढून घेणे. वरून चवीनुसार मीठ, साखर, लाल तिखट, जीरे पूड, मिरपूड घालून घेणे. छान उकळून झाले कि गॅस बंद करावा.

  5. 5

    मस्त गरम गरम हे क्रीमी सूप सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes