लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..
पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय..

लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)

#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..
पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2लिंब
  2. 6 टेबलस्पूनसाखर, चवीनुसार कमी जास्त
  3. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  4. 15-20पुदिन्याची पाने
  5. बर्फ
  6. 2 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. लिंबू धुवून घ्यावे. आणि त्याचे साल बारीक किसून घ्यावे, लिंबाचा पांढरा भाग दिसेपर्यंत. फोटोत दाखवल्याप्रमाणे.

  2. 2

    मिक्सर जार मध्ये आधी साखर टाकावी, काळे मीठ, लिंबाच्या सालीचा किस, पुदिना, टाकावा. लिंबू पिळून घ्यावे. थोडेसे पाणी टाकावे.

  3. 3

    सर्व मिक्सर मधून फिरवून घ्यावे. छान एकत्र व्हायला हवे. पुन्हा आवश्यकतेनुसार पाणी टाकून फिरवून घ्यावे.

  4. 4

    आता हे तयार झालेले सरबत गाळून घ्यावे. सर्व्हिंग ग्लास मध्ये आधी बर्फ टाकून नंतर त्यात तयार गाळलेले सरबत टाकावे.

  5. 5

    आवडीनुसार सजावट करून थंडगार सर्व्ह करावे लिंबू पुदिना सरबत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes