कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला.

कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)

#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 250 ग्रॅमसोललेली कोळंबी
  2. 1/2 कपओले खोबरे काप
  3. 1/4 कपसुकं खोबरे किस
  4. 3मध्यम आकाराचे कांदे
  5. 1 लहानटोमॅटो
  6. थोडी कोथिंबीर
  7. 1/2लिंबू
  8. 1/2 इंचआलं
  9. 7-9लसूण पाकळ्या
  10. 1 टेबलस्पूनकोकम आगळ किंवा कोकम पण चालेल
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1/2 टीस्पूनमीठ
  13. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  14. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1/2 टेबलस्पूनधने पावडर
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. 2-3 टेबलस्पूनतेल
  18. थोडे गरम पाणी

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    कोळंबी दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घेणे
    त्यातील काळा धागा काढून घेणे. धुतलेल्या कोळंबीला हळद, मीठ, अर्धा लिंबू पिळून चांगले मिक्स करून घेणे व मॅग्नेट होण्यासाठी ठेवून देणे.

  2. 2

    दोन कांदे उभे चिरून घेणे. ओले खोबरे व सुके खोबरे किसून घेणे. हे सर्व तव्यावर लालसर भाजून घेणे.ओले खोबरे 2-3 मिनिटे परतवून घेणे. यात आलं,लसूण कोथिंबीर घालून थंड झाल्यावर मिक्सर मधून मसाला वाटून घेणे.

  3. 3

    एक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की, हिंग व कांदा घालणे. कांदा गुलाबीसर भाजून झाला, की टोमॅटो घालून परतणे.

  4. 4

    कांदा,टोमॅटो छान परतून,नंतर सर्व मसाले घालून 5 मिनिट परतणे. मॅग्नेट झालेली कोळंबी घालून पाच मिनिटे परतणे.

  5. 5

    मग वाटलेला मसाला घालून छान परतून घेणे गरम पाणी हवे ति घालून घेणे मीठ बेतानेच घालने कारण आधी कोळंबीला पण लावलेल आहे

  6. 6

    पाणी घातल्यावर उकळी येऊ द्यावी. नंतर त्यात कोकम आगळ घालून मिक्स करून घेणे व गॅस मंद आचेवर ठेवून कोळंबी शिजू द्यावी. 10 मिनिटे तरी ठेवावे.

  7. 7

    या रस्साबरोबर तांदळाची भाकरी हवीच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes