वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2
कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात.

वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)

#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2
कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 1 कपकडवे वाल
  2. 1मोठा कांदा
  3. 1 लहानटोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनधने पावडर
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1 टेबलस्पूनगूळ
  12. 2 टेबलस्पूननारळाचा चव
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. थोडे पाणी
  15. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कडवे वाल एक दिवस भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून कापडात बांधावी किंवा मोडाच्या भांड्यात (स्प्राऊटस् मेकर) ठेवावे. तिसऱ्या दिवशी त्याची भाजी करावी.

  2. 2

    मोड आलेल्या वालाची सालं काढून घ्यावी. काही वालांची सालं निघत नसल्यास कोमट पाणी घालून पाच मिनिटाने काढावे. सालं काढून घेतलेले वाल स्वच्छ धुऊन घ्यावे.

  3. 3

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. कोथंबीर चिरून घ्यावी.

  4. 4

    गॅसवर कढई तापत ठेवून,त्यात तेल घालावे. तेल तापले की, कांदा गुलाबीसर परतवून घेणे. हिंग घालावा.टोमॅटो घालून परतून घ्यावे.

  5. 5

    सर्व मसाले घालून परतून घ्यावे. नंतर सोललेले वाल घालावे व परतून घेणे. थोडे पाणी व मीठ घालून हलवून घ्यावे.झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे. मधून-मधून शिजले की, नाही ते पाहणे.

  6. 6

    मिक्सरमधुन नारळाचा चव,जीरे व थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.वाल शिजले की,नारळाचे वाटण त्यात घालावे. थोडासा गूळ घालावा व चांगले हलवून घेणे.

  7. 7

    वाल शिजले की, नारळाचे वाटण त्यात घालावे. थोडासा गूळ घालावा व चांगले हलवून घेणे.

  8. 8

    1-2 उकळी आली की, गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. तयार झाले, वालाचे बिरडे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes