कोळंबी बिर्याणी (kombdi Biryani recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी)
माझे माहेर मुंबईचे असल्यामुळे मला समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे खूप आवडतात. कोलंबीचे अनेक प्रकार करता येतात. कोळंबी फ्राय,कोळंबी मसाला,कोळंबी करी.कोळंबी टाकून भाताचे पण अनेक प्रकार करता येतात. माझा आवडता पदार्थ Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी) करत आहे.

कोळंबी बिर्याणी (kombdi Biryani recipe in marathi)

Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी)
माझे माहेर मुंबईचे असल्यामुळे मला समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे खूप आवडतात. कोलंबीचे अनेक प्रकार करता येतात. कोळंबी फ्राय,कोळंबी मसाला,कोळंबी करी.कोळंबी टाकून भाताचे पण अनेक प्रकार करता येतात. माझा आवडता पदार्थ Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी) करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. 1 वाटीसोललेली कोळंबी
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1उभा चिरलेला कांदा तळण्याकरता
  5. 1 टेबलस्पूनलसूण अद्रक पेस्ट
  6. 1/2 मोठा चमचातेल
  7. 2 टेबलस्पूनतिखट,
  8. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  9. 1 टेबलस्पूनधने पावडर
  10. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  11. 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  12. 1 टेबलस्पूनचिकन मसाला
  13. 1/4 टेबलस्पूनहळद
  14. चवीपुरते मीठ
  15. 1 वाटीबासमती तांदूळ
  16. 1 टेबलस्पूनतिखट
  17. 2क्यूब बटर
  18. 4-5 काजू तळलेले
  19. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  20. अर्ध्या लिंबाचा रस

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    प्रथम कोळंबी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. कोळंबी मध्ये अर्धा लिंबू,आणि मीठ घालुन मॅरीनेट करून ठेवावे.एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावा.आणि एक दोन तास निथळत ठेवावा. कढई मध्ये बटर टाकावे. त्या मध्ये जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर मीठ टाकावे. आणि बासमती तांदूळ बटर मध्ये परतवून घ्यावा.

  2. 2

    तांदळामध्ये एक वाटी गरम पाणी टाकावे. कढई मध्ये प्लेट ठेवून त्यावर पाणी टाकावे.बासमती तांदूळ मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे मोकळा शिजवावा. भात शिजल्यावर पराती मधे थंड होण्यासाठी ठेवावा.

  3. 3

    कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर कांदा टाकावा.कांदा सोनेरी झाल्यावर लसूण अद्रकची पेस्ट टाकावी. त्यानंतर टोमॅटो टाकावा. टोमॅटो आणि कांदा एकजीव झाल्यावर तिखट,मीठ,हळद,चिकन मसाला,जीरे पावडर,धने पावडर,गरम मसाला टाकावा.

  4. 4

    त्यानंतर मॅरीनेट केलेली कोळंबी टाकावी.किंचित पाणी टाकावे आणि कोळंबी मसाल्यामध्ये परतवून घ्यावे.एक उकळी येवू द्यावी.

  5. 5

    उकळी आल्यावर गॅस बंद करावा. आणि कोलंबी बाउल मध्ये काढून घ्यावी.

  6. 6

    बिर्याणी साठी कांदा उभे चिरून घ्यावा. आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावा. काजू पण तेला मध्ये तळून घ्यावे. कांदा, बटर,बिर्याणी मसाला कोथिंबीर एकत्र काढून ठेवावे.

  7. 7

    आता बिर्याणीचे लेअर लावावे. कुकर मध्ये थोडे बटर लावावे. एक लेअर भात,दुसरा लेअर कोळंबी,तिसरा लेअर तळलेले कांदे, काजू,कोथिंबीर आणि बिर्याणी मसाल्याचा घ्यावा. अशाप्रकारे लेअर लावून घ्यावे.

  8. 8

    अश्या प्रकारे सर्व भाताचे लेअर लावून घ्यावे. कुकारला सिल्व्हर फाईल लावावे. आणि त्यावर प्लेट ठेवावी.प्लेट वर जड वस्तू ठेवावी आणि पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवावे.

  9. 9

    बिर्याणी तयार झालेली आहे त्यावर कोथिंबीर पेरावी. आणि सर्व्हिंग बाउल मध्ये काढावे.

  10. 10

    कोळंबी/झिंगा बिर्याणी थोडी कोथिंबीर आणि ओला नारळ गार्निश करून... सोलकढी / फ्राय झिंगा सोबत सर्व्ह करावा... छान लागतो

  11. 11

    (कोळंबी मॅरिनेट करताना मीठ टाकले असल्यामुळे आणि बासमती तांदूळ मध्ये मीठ टाकले असल्यामुळे कोळंबीची भाजी करताना मीठ कमी टाकावे)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes