कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS1
#konkan

माझे सासर हे मुळचे कोकणातले आहे. राजापूर येथील धाऊलवल्ली या गावात. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा गावी गेलो होतो तेव्हा माझ्या काकू सासूबाईंनी बनवलेली ही फणसाची भाजी. त्यात फणस पण घरचाच होता. खूपच आवडली होती मला ती भाजी. पण तेव्हा घरात सगळे माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी खूपच नवीन होते. त्यामुळे तेव्हा रेसिपी वगैरे खोलात न जाता मस्त भाजी आवडीने खाऊन घेतली. नंतर पुढे काकूंची छान ओळख झाली आणि आता तरी मी बऱ्याच कोकणी पद्धतीच्या रेसिपी त्यांना अधून मधून विचारून करत असते. ही फणसाची भाजीची रेसिपी त्यांचीच आहे. RC: सौ स्मिता गोखले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३ लोक
  1. 1/2 किलोकच्चा फणस
  2. 1/2 कपकिंवा आवडीनुसार भिजवलेले शेंगदाणे
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1 चमचाकाश्मिरी लाल तिखट (ऑप्शनल)
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचातेल फणस वाफवून घेण्यासाठी
  7. 3-4 चमचेतेल भाजी फोडणीसाठी
  8. 1 चमचामोहरी
  9. 1/4 चमचाहिंग
  10. 6-7लसूण पाकळ्या
  11. 6-7कडीपत्ता
  12. थोडासागूळ (१-२ चमचे किंवा आवडीनुसार)
  13. 1/2 कपओले खोबरे
  14. चिरलेली कोथिंबीर
  15. 1 चमचाकिंवा चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    फणस चिरून त्यातला नको असलेला भाग ज्याला पाव असे म्हणतात काढून घ्यावा आणि भाजीसाठीचा उपयोगी भाग चिरून स्वच्छ धुऊन घ्यावा. मी कोवळे गरे आणि आठळ्या तसेच ठेवले आहेत. गरे चिरून घेण्याची गरज नाही.

  2. 2

    आता कुकरच्या भांड्यात फणस वाफवून घ्यावा. वाफवताना त्यात १ चमचा हळद, १/२ चमचा मीठ आणि १ चमचा तेल घालावे. पाणी घालू नये. कारण कुकरमध्ये वाफेवर फणस पुरेसा शिजतो. पाणी घातल्यास जास्त शिजुन चवीमध्ये फरक पडू शकतो.

  3. 3

    फणस वाफवून घेताना त्याबरोबर भिजवलेले शेंगदाणे सुद्धा वेगळ्या भांड्यात कुकरमध्ये वाफवून घ्यावे. चिमुटभर मीठ घालावे. मीठ घातल्यामुळे शेंगदाण्याला छान चव येते.

  4. 4

    वाफवलेला फणस हातानेच थोडा मुरडून घ्या.

  5. 5

    आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यात ३-४ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग,लसूण,घाला.

  6. 6

    लसूण छान परतल्यावर,कडीपत्ता घाला. वाफवलेले शेंगदाणे घाला.

  7. 7

    शेंगदाणे २-३ मिनिटे परतून झाले की त्यात लाल तिखट,काश्मीरी लाल तिखट घाला. कशिमीरी तिखट रंगासाठी वापरले आहे. ऑप्शनल आहे अगदी.

  8. 8

    आता यात वाफवून हाताने मुरडलेला फणस घालावा आणि छान मिक्स करून घ्या.मिक्स करून झाला की चवीनुसार मीठ घाला. मीठ आपण फणस वाफवतानही घातले आहे त्यामुळे गरज असेल तरच आपल्या चवीनुसार घाला.

  9. 9

    आता यामध्ये २ चमचे गुळ घाला.ओले खोबरे घाला.छान मिक्स करून घ्या. आणि एक छान वाफ येऊ द्यावी. वरून थोडी कोथिंबीर पेरा.

  10. 10

    आपली कच्च्या फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. सर्व्ह करताना आवडत असेल तर पुन्हा थोडे ओले खोबरे घाला.

  11. 11

    तळटीप: सगळ्यात शेवटी यावर भरली सांडगी मिरची तळून घालायची पद्धत आमच्या गावी आहे.पण मला सध्या मिळू न शकल्यामुळे मी घातली नाही. सांडगी मिरचीची वरून दिलेली फोडणीमुळे भाजीला एक वेगळीच चव येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes