सवाकणी (काळी आमटी) (kali amti recipe in marathi)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#KS1 #किचन स्टार चॅलेंज
कोकण म्हटलं की आठवते कोकण रेल्वे, लाल चिर्याच्या दगडांची घरं, रस्त्यांच्या दुतर्फा आमराया, ऊंच ऊंच नारळाच्या बागा, ओल्या काजूची उसळ आणि सर्वांचा लाडका कोकणचा राजा "हापूस"!
काही ठराविक गोष्टींचा अपवाद वगळता आम्ही कोकणातील रत्नागिरी, मालवण बद्दल काहीसे अनभिज्ञच होतो. पण मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर ही सुद्धा कसर पूर्ण झाली. बहीणीचे सासर जरी "पूणे" असलं तरी नोकरीच्या निमित्ताने स्थायिक ती २१ वर्षांपासून पक्की रत्नागिरीकर झाली आहे. तिच्या घरी कामासाठी येणाऱ्या मावशींची ही पारंपारिक कोकणी रेसिपी! खास माझ्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी त्यांनी बनवलेली साधीच पण अफलातून चवीची ही रेसिपी पातळ भाजीला पर्याय ठरते. "सवाकणी" ला "काळी / गरम मसाल्याची आमटी" सुध्दा म्हणतात. आमटी चे वैशिष्ट्य म्हणजे टोमॅटो चे सार सोडले तर टोमॅटो वर कोकणात कोणी जीव लावत नाही, तिथे, सगळी सत्ता एकट्या "कोकम" चीच! मऊ गुरगुट्या भात, तांदळाची गरम भाकरी, आंबोळी अगदी ब्रेड बरोबर देखील ही आमटी चाखली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण अर्धा तास
४ जणांना
  1. 1 वाटीतुरीची डाळ शिजवून
  2. 1मोठ्ठा कांदा मध्यम आकारात चिरलेला
  3. 1छोटासा बटाटा फोडी करून
  4. 5-7लसूण पाकळ्या ठेेेचूूून
  5. 2-3आमसुले
  6. 2सुपारी इतका गुळ
  7. फोडणी चे साहित्य
  8. 1 चमचामोहोरी
  9. 1/2 चमचाजीरे
  10. 2 चिमूटभरहिंग
  11. 1 चमचाहळद
  12. 2मोठ्ठे चमचे लाल तिखट
  13. वाटण बनवण्यासाठी -
  14. 1कांदा
  15. 1तुकडा सुक्कं खोबरं
  16. 3-4लसूण पाकळ्या
  17. 10मिरे
  18. 5-6लवंगा
  19. छोटासा तुकडा दालचिनी
  20. 2-3 चमचेतेल
  21. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

साधारण अर्धा तास
  1. 1

    सर्वात प्रथम वाटण बनवण्यासाठी कांदा आणि खोबरे डायरेक्ट गैसवर छान खरपूस भाजून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर खोबर्याचे बारीक तुकडे करावेत आणि कांदा सोलून तो ही ओबडधोबड चिरून घ्यावा.

  2. 2

    कोरडे मसाले हलके गरम करून घ्यावेत आणि कांदा, लसूण पाकळ्या, खोबर्यासोबत मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    एका पातेल्यात १ चमचा तेल गरम करून फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण, कांदा, बटाटा परतवून घ्यावे. नंतर हळद, लाल तिखट आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे. मालवण भागात थोडा मालवणी मसाला ही घातला जातो.

  4. 4

    नंतर त्यात शिजवलेली डाळ, 3 वाट्या पाणी, गुळ, आमसुले आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर ७ - ८ मिनिटे छान उकळून घ्यावी.

  5. 5

    फोडणीच्या पळीमध्ये पुन्हा एकदा फोडणी करून लसणीच्या पाकळ्या तळसल्यावर फोडणी आमटीवर ओतावी.

  6. 6

    तयार सवाकणी / आमटी भात आणि अरवी च्या कापांसोबत सर्व्ह केली आहे. तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा अगदी ब्रेड बरोबर ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
शर्वरी पवार - भोसले
रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

Similar Recipes