अळूची कणसे घालून भाजी (aluche kanse ghalun bhaji recipe in marathi)

smita karkhanis @Smita_ckpfood_1
अळूची कणसे घालून भाजी (aluche kanse ghalun bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कृती..कणसांचे योग्य तुकडे करून थोडे मीठ घालून कुकर मध्ये उकडून घ्यावे. अळूची भाजी भाजी बारीक चिरावी... फोडणीसाठी तेल घालून.
- 2
त्यात हिंग जीरे मोहरी मेथी दाणे तडतडल्यावर हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून त्यात हळद तिखट घालून भाजी लगेच घालावी.. चांगली परतून घेऊन झाकण ठेवून शिजू द्यावे..शिजल्यावर चांगली घोटून त्यात शिजलेली कणसे घालावी..
- 3
एकजीव झाल्यावर चिंचेचा कोळ चण्याचे पीठ गूळ एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी येऊ द्यावी...त्यात गोडा मसाला घालून उकळी आणावी.वरून चरचरीत हिंग मोहरीची फोडणी करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)
#msr चिंच गूळ घालून केलेली अळूची भाजी भात आणि तूप अहाहा खूप मस्त लागते अगदी लहानपणाची आठवण येते माझ्या आजीनी केलेली ही भाजी मला फारच आवडते त्या पाककृती मी केली आहे. Rajashri Deodhar -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
नागपुरी धो प्याच्या पानांची पातळ भाजी (dhopyachya pananchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज#shr#श्रावण शेफ वीक week3आमच्या विदर्भाकडे धोक्याच्या पानाची म्हणजेच अळू च्या पानांची पातळ भाजी ही नेहमी प्रत्येक सणाला श्रावण महिन्यात घराघरात भरते.श्रावण सोमवारी,प्रत्येक सणाला गौरी गणपती,मंगळागौर पोळा, ला ही भाजी हमखास बनते च पातळभाजी म्हणजे अळूचीच असे समीकरण ठरलेले.ही भाजी सर्वांना खूप आवडते शिवाय पौष्टिक ही आहे. Rohini Deshkar -
अळूची पातळ भाजी (alu chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मतपावसाळा सुरू झाला की विविध प्रकारच्या रान भाज्या दिसू लागतात. त्यातील काही भाज्या अनेकांना खूप आवडतात. त्यापैकी एक म्हणजे अळूची भाजी. खास करून श्रावण महिन्यात घरातील सत्यनारायण असो वा मंगळागौरी असोत अळूची पातळ भाजी अगदी हमखास असतेच. जेंव्हा आपले पावसाळी चॅलेंज आले तेंव्हा मी ठरवले होते की अळूची भाजी नक्की करायची, पण या वर्षी कोरोना मुळे मला भाजीचे अळू मिळत न्हवते. काल एका ठिकाणी एक जुडी मिळाली आणि मी लगेच ती घेऊन अळूची भाजी केलीच. माझ्या सासूबाई खूपच सुंदर करायच्या ही भाजी त्यांच्या कडून शिकून मी पण एक्स्पर्ट झाले. चला तर मग अळूची पातळ भाजी करूयात....Pradnya Purandare
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#ckps#सौ. स्मिता कारखानीस##कुकपॅड रेसिपीज##श्रावण स्पेशल##नारळी भात# smita karkhanis -
कांदयाची पात घालून केलेली शेव भाजी (kandyachi pat sev bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. आणि त्यात घरात कधी भाजी नसेल तर त्यासाठी कमी वेळात झटपट होणारी आणि तितकीच खमंग अशी ही शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेव भाजी कांद्याची पात घालून बनवलेली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
-
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane -
-
-
सात्त्विक अळूची भाजी (aloochi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विकश्रावण महिना सुरु झाल्यावर खूप जणांच्या घरी जेवणात कांदा लसूण घालत नाहीत. शुद्ध सात्विक जेवण बनवलं जातं. श्रावण महिन्यात खूप सणवार येतात त्यावेळी नैवेद्यामधे गोडधोड पदार्थ असतातच त्याबरोबर छान अगदी साग्रसंगीत स्वयंपाक करतात. वरण-भात, भाजी आणि एखादा गोड पदार्थ हा प्रामुख्याने असतो. आमच्या कडे नैवेद्यासाठी बनणार्या आमटी आणि भाजीभधे कांदा-लसूण घालत नाहीत. नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मी नैवेद्यासाठी अळूची भाजी केली होती. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ckps#स्मिता कारखानीस##भरली केळी#हा पदार्थ खासकरून गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी करतात smita karkhanis -
कोंडुस रान भाजी (ran bhaji recipe in marathi)
# श्रावण महिन्यातील रानभाजीही पावसाळी भाजी श्रावणात मिळते ही भाजी खास आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# श्रावण स्पेशल भाजी Minal Gole -
अळूचं फदफदं - पारंपरिक सात्विक भाजी (alooch fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकभाजीच्या अळूची कोवळी पानं आणि देठ घालून ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची सात्विक भाजी कांदा लसूण न घालता केलेली. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नैवेद्याच्या पानात, लग्न समारंभाच्या भोजनात ही भाजी केली जाते. एवढ्या चविष्ट भाजीला असं विचित्र नाव का दिलंय माहित नाही. Sudha Kunkalienkar -
-
ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमी साजरी करण्यात येते. या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी खासकरुन ऋषीची भाजी सुद्धा बनवली जाते. तर यंदाच्या ऋषी पंचमी निमित्त ही स्पेशल भाजी बनवण्याची रेसिपी येथे पहा:9 Yadnya Desai -
अळूचे फतफते (aluche fatfate recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल रेसिपी साठी मी आज चेतना भोजक ताई यांची अळूचे फतफते ही रेसिपी मी कूकस्नॅप करीत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अळुचं फदफदं (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnapमी Varsha Deshpande ह्यांंची रेसिपी रिक्रिएट केली. श्रावण महिना सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं किंवा फदफदं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. तेव्हा आजची रेसिपी अळूचं फदफदं(शब्द फारसा बरा नाहिये पण भाजी उत्तम लागते) किंवा अळूची पातळ भाजी. स्मिता जाधव -
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_भाजी_cooksnap_challenge#अळूची_भाजीश्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवाई पसरुन निसर्गाचे सुंदर रुप आपल्याला बघायला मिळते. या महिन्यात खूप सणवार साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाची पूजा करुन आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी चिरणे, कातणे तसेच फोडणी न देणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. ज्यांना जमेल तशी प्रथा पाळून नागपंचमी साजरी करतात. यादिवशी आमच्या कडे नागोबाला दुध लाह्या प्रसाद म्हणून दाखवतात. त्याच बरोबर अळूची भाजी आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. पारंपारिक पध्दतीने बनवलेली अळूची भाजी यालाच अळूचे फदफदे असेही म्हणतात. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अळूचं फदफदं (aluch fadfand recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशल_रेसिपी_चॅलेंज" अळूचं फदफदं " अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. भरपूर सारे पौष्टिक तत्व जसे व्हिटॅमिन -सी , मॅग्नेशियम, आयर्न,झिंक आणीब फायबर ने परिपूर्ण असलेली अळूची भाजी किंवा फदफदं एकदा तरी प्रत्येकाच्या घरी बनतेच...😊😊बाराही महिने मिळणाऱ्या या भाजीची श्रावणात विशेष करून पावसाळ्यात चव जरा जास्तच अप्रतिम लागते....👌👌 Shital Siddhesh Raut -
कोहळ्याची बाकर भाजी (kohalyachi bhakar wadi recipe in marathi)
#रेसीपीबुक week7#सात्विक रेसिपीज आमच्या नागपूर कडे लाल भोपळा कोहळा म्हणतात व ही भाजी श्रावण मासा मध्ये व चातुर्मासाचा मध्ये हमखास बनवली जाते. श्रावण सोमवारी पोळा नागपंचमी गौरी गणपती मधे ही भाजी बनवल्या जाते. यात कांदा लसूण वापरल्यामुळे ही सणावारी हमखास बनवली जाते. व सर्व आनंदाने खातात. Rohini Deshkar -
अळुचे फदफदे (aluche fadfade recipe in marathi)
#रानभाजी# सर्वात जास्त खाल्ली जाणारी रानभाजी.एकदम पोष्टीक नी पावसाळ्यात अतिशय छान चव असते ह्या भाजीला. Hema Wane -
कंदमुळ म्हणजेच ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_रेसिपी#कंदमुळ_म्हणजेच_ऋषीची_भाजीगणपती उत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी आमच्याकडे प्रामुख्याने कंदमुळं म्हणजेच ऋषीची भाजी नैवेद्यासाठी बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र उकडून मिक्स करतात. तसेच या भाजीला तेल, हिंग मोहरीची फोडणी देत नाही. आणि यात फक्त मोजकेच मीठ, मसाले घालून खूप अप्रतिम चवीची कंदमुळं म्हणजेच ऋषीची भाजी तयार होते. ही भाजी नंतर खूप घरी वाटली जाते. आमच्या इकडे लहान मोठे सगळे जण आनंदाने आणि आवडीने कंदमुळ म्हणजेच ऋषीची भाजी खातात. दोन तीन दिवसांनंतर पण ही भाजी मुरल्यामुळे खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात. सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो.हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते. म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. Prachi Phadke Puranik -
तेलपोळी (tel poli recipe in marathi)
#CKPS - सीकेपी लोकांची खासियत असलेली तेलपोळी ही अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आज मी त्याचीच कृती तुमच्या सगळ्यांसाठी देत आहे मला स्वतःला ही तेलपोळी खूप आवडते. Pranjal Dighe -
कोहळ्याची भाजी (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल#week3#कोहळ्याची भाजीश्रावणात भरपूर सण असतात कांदा लसूण वर्ज्य केला जातो अशावेळी रस्सेदार भाजी जेवणाची लज्जत वाढते पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
अळू चे फदफद (अळू ची पातळ भाजी) (alu chi patal bhaji recipe in marathi)
#KS2#पुणेरी अळूची पातळ भाजीमस्त आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी ही प्रत्येक लग्न समारंभात असते....चव तर अप्रतिम.... Shweta Khode Thengadi -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आळूवडीआणिबर्फीरेसिपीpost1कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच आवडते. पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठीवापरली जातात.तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग पदरासारख्या कितीतरी आठवणी ह्या एका मराठमोळ्या पदार्थांभोवती घुटमळतात. एकेका सुरेख आठवणींचे पदर हळूहळू उलगडत पार भुतकाळाची वारी घडवून आणतात. अळूवडीची पाने आता जरी सर्रास १२ महिने मिळत असली तरी पूर्वी जास्त करून पावसाळ्यात उपलब्धता असे. मस्त पावसाळ्यातील दिवस, हिरवाईच्या अनेक छटा ल्यालेली झाडे, धुंद वातावरण आणि खमंग शाकाहारी जेवणाचा बेत. गौरी-गणपतीत तर घरी हमखास अळूवडीचा बेत असतो. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही ही आळूवडीची रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता. Nilan Raje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15425005
टिप्पण्या (2)