ड्रायफ्रूट्स पिस्ता आईस्क्रीम (dryfruits pista ice cream recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#icr उन्हाळा आला कीं , आईस्क्रीमचा भाव वधारतो. मुलांच्या फर्माइशी पण वाढतात.मग निरनिराळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरात बनू लागतात.
मी दूधात, भरपूर ड्रायफ्रूट्स, पिस्ते टाकून चविष्ट आणि पौष्टिक असे पिस्ता आईस्क्रीम तयार केले आहे .तुम्हीही नक्की करून पहा. चला तर त्याची कृती पाहू...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
2 सर्व्हिंगस
  1. 500 मि.ली.दूध (फुल्ल क्रीम)
  2. 1 टीस्पूनकॉर्नफ्लोअर
  3. 2मारी बिस्कीट चुरा
  4. 25-30 ग्रॅम साखर
  5. 1 टेबलस्पूनपिस्ता काप
  6. 1 टेबलस्पूनकाजू,बदाम काप
  7. 3-4 थेंबपिस्ता इसेन्स
  8. 1 चिमूटहिरवा रंग

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    दूध गॅसवर ठेऊन 10 -12 मिनिटे उकळा.गॅसची फ्लेम बारीक करा.
    दुधात साखर टाकून ढवळत रहा.साखर विरघळली कीं, त्यांत ड्रायफ्रूट्स, पिस्ता काप, पिस्त्याचे इसेन्स 3 -4 थेंब व चिमूटभर हिरवा रंग टाकून दूध ढवळत रहा.

  2. 2

    मिक्सर वर मारी बिस्किटे फिरवून त्यांचा चुरा करा. बाऊलमध्ये मध्ये 1/2 कप कोमट दूध घेऊन, त्यांत कॉर्नफ्लॉवर व मारी बिस्किटांचा चुरा टाकून, चमच्याने त्याची छान पेस्ट तयार करा. गुठळी होऊ देऊ नका. ही पेस्ट गॅसवर उकळत असलेल्या दुधात टाकून 5 ते 7 मिनिटे दूध उकळा. सारखे ढवळत रहा.

  3. 3

    हळूहळू दूध दाटसर होईल. गॅस बंद करा व दूध गार होऊ द्या.
    प्लास्टिकच्या डब्यात हे मिश्रण ओता. वरून पुन्हा पिस्ता काप भुरभुरा व फ्रिजर मध्ये 12 ते 14 तास सेट होण्या साठी ठेवा.नंतर फ्रीजमधून बाहेर काढून 10 मिनिटे, रूम टेंपरेचरला ठेवा.

  4. 4

    मस्त पैकी सकस,पौष्टिक व स्वादिष्ट असे आईस्क्रिम तयार झाले. त्याचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes