केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम..

केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)

#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदूध
  2. 4 टेबलस्पूनसाखर
  3. 2 टेबल स्पूनकस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवर
  4. 2 टेबलस्पूनकाजू बदाम पिस्ता काप
  5. केसर
  6. 3 टेबलस्पूनघट्ट ताजी साय

कुकिंग सूचना

  1. 1

    गॅसवर एका पसरट भांड्यात दूध टाकून ते आटविण्यास ठेवावे. दूध गरम झाल्यावर त्यात साखर टाकावी आणि 4-5 मिनिट उकळू द्यावे.

  2. 2

    तोपर्यंत 1/2 कप कोमट दुधात, दोन टेबलस्पून custard powder टाकून मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    मिक्स करताना त्यात गुठळ्या होऊ देऊ नये. त्यानंतर दुधाखालचा गॅस कमी करून, त्यात, थोडे थोडे कस्टर्द पावडर चे मिश्रण टाकावे. त्यावेळी सतत ढवळत राहावे.

  4. 4

    साधारण घट्ट झाले, की गॅस बंद करून दुधाचे मिश्रण थंड करावा. थंड करतानाही सतत ढवळत राहावे. आता हे थंड मिश्रण एका मिक्सर च्या भांड्यात टाकावे.

  5. 5

    त्यात 3 टेबलस्पून घट्ट ताजी साय टाकावी आणि मिक्सर मधून फिरवून घ्यावे. आता आईस्क्रीम चा बेस तयार आहे. मी दोन प्रकार केले आहे. म्हणून दोन वेगवेगळ्या हवाबंद डब्यात हे मिश्रण टाकले.

  6. 6

    एक प्लेन व्हॅनिला, आणि दुसरे केसर ड्रायफ्रूट्स.. त्यामुळे एका डब्यात मी काजू बदाम, पिस्ता काप, आणि केसर टाकले. आणि दोन्ही डबे बंद करून 8*9 तासांसाठी, फ्रीझर मध्ये ठेवावे.

  7. 7

    आता ते उघडल्यावर मस्त क्रिमी, आईस्क्रीम तयार... सर्व्ह करा आता छान आवडीनुसार सजावट करून.😀

  8. 8

    तेव्हा घ्या आस्वाद थंडगार आईस्क्रीम चा😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes