बाकरवडी (bhakarwadi recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#KS2 पश्चिम महाराष्ट्राचा भाग असलेले पुणे शहर आणि इथली खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर बाकरवडी ही येतेच.... पुण्यातील चितळेंची बाकरवडीची ख्याती संपूर्ण जगात आहे. आंबट, गोड, तिखट, खुसखुशीत अशी बाकरवडी सर्वांनाच आवडते. चला तर मग बघुया रेसिपी.....
#KS2

बाकरवडी (bhakarwadi recipe in marathi)

#KS2 पश्चिम महाराष्ट्राचा भाग असलेले पुणे शहर आणि इथली खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर बाकरवडी ही येतेच.... पुण्यातील चितळेंची बाकरवडीची ख्याती संपूर्ण जगात आहे. आंबट, गोड, तिखट, खुसखुशीत अशी बाकरवडी सर्वांनाच आवडते. चला तर मग बघुया रेसिपी.....
#KS2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटे
४-५ जणांसाठी
  1. 2 चमचेबेसन
  2. 1 वाटीमैदा
  3. 2 चमचेचिंच व गुळाची चटणी
  4. 1-2 वाटीसुके खोबरे किसून
  5. 2 चमचेधने
  6. 2 चमचेतीळ
  7. 1 चमचाजीरे
  8. 1 वाटीबारीक शेव
  9. 1 मोठा चमचातिखट
  10. 1 चमचागरम मसाला
  11. 1 चमचासाखर
  12. चवीनुसारमीठ
  13. तळण्यासाठी व मोहनसाठी तेल
  14. 1 वाटीबारीक चिरून कोथिंबीर

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    १ मोठी वाटी मैदा व २ चमचे बेसन मध्ये २-३ चमचे तेलाचे कडकडीत मोहन व चवीनुसार मीठ घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. नंतर १५-२० मिनीटे हे पीठ झाकून ठेवावे...

  2. 2

    आता आपण बाकरवडीचे सारण तयार करून घेऊया, प्रथम सुके खोबरे, धने, जीरे, तीळ सगळं छान भाजुन घ्या. यातच कोथिंबीर घालून परतून घ्या...

  3. 3

    आता भाजुन घेतलेलं मिश्रण तिखट, मीठ, गरम मसाला, साखर आणि आपण १ वाटी शेव घेतली होती त्यातील अर्धी वाटी शेव सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं...

  4. 4

    आता मळून घेतलेल्या पिठाची पातळ पोळी लाटून घ्यावी. या पोळीला चिंच व गुळाची चटणी चमचाने लावून घ्या. नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं सारण एकसारखे पसरून घ्या. बाजूला ठेवलेल्या अर्धी वाटी शेवेतील थोडी शेव हाताने वरून भूरभूरून घ्या. सारण या पोळीला नीट लागावे, सुटू नये यासाठी वरतून लाटणे फिरवून घ्यावे....

  5. 5

    आता या पोळीचा घट्ट रोल वळून घ्या, कडा थोडे पाणी लावून बंद करून घ्या आणि चाकूने बोटाच्या पेरांच्या आकाराचे काप करून हाताने थोडेसे दाबून मंद आंचेवर तळून घ्या....

  6. 6

    तयार आहे आंबट, गोड, तिखट आणि खुसखुशीत अशी ही फूल टू टेस्टी बाकरवडी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

Similar Recipes