कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#रेसिपीबुक #week12

कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली.

कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12

कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 - 30 मिनिटे
4 - 5 जणांसाठी
  1. 2 कपमैदा
  2. 1 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 4/5 टेबलस्पूनपाणी
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनधने जाडसर वाटलेले
  9. चिमूटभरहिंग
  10. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  11. 1हिरवी मिरची
  12. 1/2 टीस्पूनकिसलेले आले
  13. 2मध्यम कांदे
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. 1/2 टीस्पूनचाट मसाला किंवा आमचूर पावडर
  17. 1/2 टीस्पूनसाखर
  18. 1/4 कपबेसन पीठ
  19. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  20. 1/2 टीस्पूनबडीशोप

कुकिंग सूचना

25 - 30 मिनिटे
  1. 1

    एका बाऊल मध्ये बारीक रवा,मैदा,मीठघालून मिक्स करून घेणे. साजूक तूप घालून सर्व पिठाला चांगले चोळून घ्यावे. पिठाची मूठ झाली पाहिजे. थोडे थोडे पाणी घालून मऊसर गोळा मळून घेणे. तेलाचा हात लावून झाकून 15-20 मिनिटे ठेवावे.

  2. 2

    कांदा,हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावा. गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तेल टाकावे.जीरे,धने,बडीशोप,हिंग घालून परतवून घेणे.

  3. 3

    नंतर कांदा घालून चांगले परतवून घेणे. गुलाबीसर होईपर्यंत परतावा. नंतर सर्व मसाले घालून परतणे.बेसन पीठ घालून 5 मिनिटे परतवून घ्यावे. मंद आचेवर करावे. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  4. 4

    पीठ एकदा मळून घेणे. त्याचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी करून घेणे. त्यात 1 टेबलस्पून तयार मसाला घालून पारी व्यवस्थित बंद करून घेणे. ताटलीत ठेवून हलक्या हाताने दाबून पसरवून घेणे. अशाप्रकारे सर्व कचोरी करून घेणे.

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून एक कचोरी व्यवस्थित तळून घेणे.

  6. 6

    चिंचेची चटणी व साधी शेव टाकून खाणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes