मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#pcr
प्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.
म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.
तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमोड आलेली मटकी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 चमचेआले मिरची कोथिंबीर वाटण
  5. 1 चमचाधणे जीरे पुड
  6. 1 चमचागरम मसाला
  7. 4-5 कढीपत्त्याची पाने
  8. 2 चमचेतिखट
  9. 1/4 चमचाहळद
  10. मीठ चविनुसार
  11. तेल आवश्यकतेनुसार
  12. 1/2 चमचाराई

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम मटकी भिजवुन नंतर कपड्यात बांधुन मोड आणावे.

  2. 2

    मग कुकर गरम करुन त्यात तेल तापवुन मोहरी घालावी,तडतडली की कढीपत्ता,आलेमिरची वाटण घालुन परतावे.

  3. 3

    मग चिरलेला कांदा टोमॅटो घालुन गुलाबीसर परतावा,मग हळद,तिखट,गरम मसाला घाला.

  4. 4

    मग मटकी घालुन आवश्यकतेनुसार पाणी घालावे.मीठ,धणेजिरे पुड घालावी.मग कुकर बंद करुन तीन शिट्या करुन घ्याव्या.

  5. 5

    कुकर गार झाला की,मटकी उसळ छान शिजलेली राहील,serving bowl मधे काढुन घ्यावी.वरुन कोथिंबीर घालावी.

  6. 6

    गरम गरम मटकी उसळ सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (5)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
सुप्रिया तुझी मटकीची उसळ मी आज करून बघितली मस्त झटपट होणारी खुप मस्त झाली👌( कुकस्नॅप )
धन्यवाद सुप्रिया🙏

Similar Recipes