तर्री पोहा (tari pohe recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS3 # विदर्भ स्पेशल # नागपुरी झणझणीत, चमचमीत, तर्री पोहे....

तर्री पोहा (tari pohe recipe in marathi)

#KS3 # विदर्भ स्पेशल # नागपुरी झणझणीत, चमचमीत, तर्री पोहे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. पोहे करण्यासाठी
  2. 1-1/2 कपजाड. पोहे
  3. 1-1/2 टेबलस्पून तेल
  4. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  5. 1कांदा चिरून
  6. 2मिरच्या बारीक करून
  7. 3-4कडीपत्ता पाने
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. चवीनुसारमीठ
  11. थोडी साखर
  12. कोथिंबीर
  13. तर्री करण्यासाठी
  14. 1 कपभिजवून उकडलेले गावरानी चणे
  15. 3 टेबलस्पूनतेल
  16. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  17. 1तेजपान
  18. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  19. 5-7मिरे
  20. 2लवंग
  21. 3 टेबलस्पूनकांदा टोमॅटो पेस्ट
  22. 2हिरव्या मिरच्या
  23. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  24. 1 टीस्पूनहळद
  25. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  26. 1 टीस्पूनधणे पूड
  27. 1 टीस्पूनमसाला
  28. चवीनुसारमीठ
  29. 3 ग्लासपाणी
  30. 1टोमॅटो
  31. कोथिंबीर

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    आधी आपण तर्री करून घेऊ. त्यासाठी, गावरानी चणे रात्रभर भिजत घालून उकडून घ्यावेत. कांदा टोमॅटो आणि दोन तुकडे बीट रूट चे घालून पेस्ट करून घ्यावी. बीट मुळे, छान रंग येतो.

  2. 2

    आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर, त्यात जीरे मोहरी, तेजपंन, मिरे, दालचिनी, लवंग टाकून परतून घ्यावे. त्यानंतर कांदा टोमॅटो पेस्ट टाकावी.

  3. 3

    हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट टाकून, चांगले परतून घ्यावे. हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकून चांगले मिक्स करावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात उकडलेले चणे टाकावे. गरम पाणी टाकून आता त्यात चवीनुसार मीठ टाकावे. आणि झाकण ठेवून 3-4 मिनिट शिजवावे.

  5. 5

    आता त्यात एका टोमॅटोचे दोन तीन भाग करून रस्स्या मध्ये टाकून पुन्हा दोन मिनिट शिजवावे.

  6. 6

    आता त्यात कोथिंबीर टाकली की चमचमीत तर्री तयार.

  7. 7

    तर्री होईपर्यंत एका बाजूला पोहे करून घ्यावे. त्यासाठी जाड पोहे घेवून, ते स्वच्छ करून घ्यावे, पाणी टाकून भिजवावे. जास्तीचे पाणी काढून टाकावे.

  8. 8

    कांदा, मिरची चिरून घ्यावे. आता गॅसवर एका कढईत तेल टाकून गरम करावे. त्यात, जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर कांदा, मिरची, कढीपत्ता टाकावा.

  9. 9

    कांदा सोनेरी झाल्यावर त्यात हळद तिखट घालून मिक्स करावे. आता त्यात भिजविलेले पोहे टाकावे.

  10. 10

    मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी. मिक्स करून दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी. आता त्यात कोथिंबीर टाकली की पोहे तयार.

  11. 11

    या प्रमाणे गरमागरम पोहे आणि चमचमीत तर्री तयार आहे.

  12. 12

    सर्व्ह करताना प्लेट मध्ये आधी, पोहे टाकावे. त्यावर तर्री, तर्रिमधील टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव टाकावी.

  13. 13

    आता ही गरमागरम चमचमीत तर्री पोह्यांची डिश, थंडगार ताकासोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes