इन्स्टंट आंबा केशर खरवस (instant amba kesar kharwas recipe in marathi)

इन्स्टंट आंबा केशर खरवस (instant amba kesar kharwas recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मध्ये दही घ्या, त्यात कॉर्न फ्लोर घालून मिक्स करा..आता यात दूध,आंबारस, आणि काॅर्नफ्लोअर घालून व्यवस्थित मिक्स करा..
- 2
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वरील मिश्रण एकत्रित घेऊन व्यवस्थित मिक्स करून फिरवून घ्या. कुकरच्या डब्याला थोडं तूप लावा..नंतर त्यावर मिश्रण ओतावे. त्यावर वेलची पावडर आणि केशर काड्या घालाव्यात.. आणि हा डबा अॅल्युमिनियम फॉइल ने झाकून घ्या म्हणजे खरवसावर वाफेचे पाणी पडणार नाही.
- 3
आता कुकरमध्ये पाणी घालून त्यावर स्टँड ठेवावा आणि त्यावर एक जाळी ठेवावी आता या जाळीच्या ताटलीवर खरवसा चा डबा ठेवून कूकरचे झाकण लावा. कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. पंचवीस ते तीस मिनिटे खरवस शिजवून घ्या.
- 4
नंतर खरवस बाहेर काढून पाच मिनिटे त्याची वाफ जाऊ दे आणि तो सुरी घालून बघा..खरवस शिजला का नाही.नंतर हा खरवस फ्रीजमध्ये गार करायला ठेवा.
- 5
आता गार झालेला खरवस बाहेर काढा आणि खरवसाच्या बाजूने सुरी फिरवून खरवसाच्या कडा सैल करून घ्या आणि हव्या त्या आकारात खरवसाचे काप किंवा तुकडे करून घ्या. तयार झाला आपला इन्स्टंट आंबा केशर खरवस..
- 6
हा इन्स्टंट आंबा केशर खरवस एका बाउल मध्ये काढा आणि सर्व्ह करा.
- 7
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट आंबा खरवस (instant amba kharwas recipe in marathi)
#Pcrमाझी रेसिपी खूप खास आहे जी मला तुमच्या बरोबर शेअर करायची आहे, त्याचा आनंद घ्या😋 Vandana Shelar -
इन्स्टंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर आमच्या गावात पहिल्यांदा आमच्या घरी आला त्यावेळी त्याची शिटी वाजणे हे अप्रूप होते. आमच्या शेजारी पाजारी सगळ्या जणी पहायला यायच्या. आता तोआपल्या स्वयपाक घरातला अविभाज्य साथीदार आहे. आधी फक्त्त डाळ भात शिजवून देतादेता त्याच्यात एकदम बदल झाला. मला खरवस प्रचंड आवडतो. पण आता खरवस बनवण्यासाठी लागणारा दुधाचा चीक मिळत नाही. मग हा उपाय केला परफेक्ट खरवस तयार झाला.. Shama Mangale -
-
इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
खरवसखरवस कुणाला नाही आवडत? पण आपण दूधवाल्याला सांगणार, तो कधी तरी महिना,दोन महिन्यांनी चीक आणून देणार... आणि त्यानंतर आपण खरवस करणार, म्हणजे तोपर्यंत खरवस खाण्याची ओढ आणि इच्छा हमखास कमी होईल. म्हणूनच पाहिजे तेव्हा खरवस करण्याची ही हमखास रेसिपी. स्मिता जाधव -
-
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr आंबा फळांचा राजा .त्यात तो हापूस असला तर खूपच छान. ही बर्फी अप्रतिम बनते. Supriya Devkar -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
-
केशर आंबा फिरनी (kesar amba phirni recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_फिरनी आंबा आणि बासमती तांदूळापासून होणारी ही अजून एक प्रकारची स्वादिष्ट रेसिपी.. अतिशय creamy texture ची ही रेसिपी..एक अद्भुत अद्वितीय अशी अजून एक चव राजाने त्याच्या जगभरातील प्रजेसाठी बहाल केलीये...जिथे राजा तिथे प्रजा..फिरनीचं मूळ भारतात नसलं तरी राजाच्या प्रेमापोटी फिरनीला कधीच आपण आपल्या गळ्यातला ताईत बनवलाय..जाणून घ्यायची आहे रेसिपी तुहांला..चला तर मग.. Bhagyashree Lele -
-
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र.4 सातारचा कंदीपेढा जसा प्रसिध्द आहे. तसेच आंबा बर्फी ही सुद्धा प्रसिध्द आहे. ही सुद्धा दुधाचा खवा बनवून केली जाते. पण मी काल मिल्क पावडरचा खवा केला. त्याचाच वापर केला आहे. Sujata Gengaje -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
-
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
आंबा लाडू/MM लाडू (amba ladoo recipe in marathi)
#amr झटपट तयार होणारे आंबा लाडू याला माझ्या घरी MM ladoo(mango Malai laddo) असेही नामकरण झाले कारण यांत मी आंबा आणि मलाई वापरली आहे .हे लाडू फ्रीजमध्ये 5-6 दिवस तर बाहेर 3-4 दिवस टिकतात. Rajashri Deodhar -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#amrआंबा स्पेशल रेसिपीतळलेले आंबा मोदक Manisha Shete - Vispute -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
आंबा रवा मोदक (amba rava modak recipe in marathi)
#आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे हो ना आंबा रवा मोदक आज गणपती बाप्पाला गोड नैवेदय दाखवते आज कुकपॅड वरील माझी५०० वी रेसिपी आहे म्हणुन हा सगळा प्रपंच खटाटोप Chhaya Paradhi -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrआंबाअतिशय आवडीचा त्याच्यामुळे आंबा आला बाजारात चकि मी त्याचे खूप सारे प्रकार बनवते त्यातला हा एक प्रकार आंबा रवा लाडू एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
-
आंबा जाम किंवा साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)
#amrवर्षभर टीकणारा हा साखर आंबा आहे Ashwini Shaha -
-
आंबा केशरीभात (amba kesari bhaat recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#आंबा_केशरीभात.. भाताचे आपण विविध प्रकार करून बघत असतो .अक्षरशः शेकड्यांनी ,हजारोंनी या भाताच्या रेसिपीज संपूर्ण जगभर अस्तित्वात आहेत .अगदी साध्या भातापासून ,मऊभातापासून ,खिचडी पासून ते नारळी भात,साखर भात,अननस भात,संत्रा भात,चेरी पुलाव,पुलावाचे असंख्य प्रकार,बिर्याणीची चमचमीत variations....तर असे हे सगळे भाताचे प्रकार आपली चव आणि भूक दोन्ही भागवण्याचं काम इमानेइतबारे करत आहेत.. यातीलच एक जबरदस्त combination म्हणजे आंबा आणि भात..बरेचसे जण आमरस आणि भात कालवून खातात..यातलंच भन्नाट combination आंबा केशरीभात आज आपण करु या... Bhagyashree Lele -
आंबा वडी (amba wadi recipe in marathi)
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.Geeta suki
-
मॅंगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#मॅंगो_आईसक्रीम.. आंबा महोत्सव साजरा करताना इस गर्मी के मौसम में ठंडा ठंडा कूल कूल मॅंगो आईसक्रीम होना ही था..😍🥭🍨 त्याशिवाय आपण आंबा महोत्सवाच्या पूर्णत्वाकडे येऊच शकत नाही..😀..चला तर मग अतिशय सोप्या ,झटपट रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#md ४० वर्षांपूर्वी माझ्या आई ने शिकवलेली आंबा वडी Shobha Deshmukh -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
More Recipes
टिप्पण्या (6)