गोळा भात आणि मसाला ताक (gola bhat ani masala taak recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

गोळा भात आणि मसाला ताक (gola bhat ani masala taak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 7-8कढीपत्ता पाने
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. मसाला ताक
  8. 1 कपआंबट दही
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 1 इंचआले
  11. 2-3लसूण पाकळ्या
  12. 1 टीस्पूनजीरे पूड
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी गरजे नुसार
  15. मीठ चवीनुसार
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. 1/4 टीस्पूनहिंग
  18. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  19. 1 टेबलस्पूनदही
  20. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  21. तेल गरजे नुसार
  22. भात करायला
  23. 2 कपतांदूळ धून
  24. 2 टेबलस्पूनदही
  25. 1 टेबलस्पूनतेल
  26. 1 टीस्पूनमीठ
  27. 1/2 टीस्पूनहळद
  28. 4 कपपाणी
  29. तडका
  30. 4-5 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    बेसन, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, मीठ, हिंग, हळद, दही, तेल घालून पीठ भिजवा, नंतर कोथिंबीर घालून घाय व मिक्स करा (पाणी घालू नका) आता त्याचा छोटा गोळा घेऊन त्याचे मुटके करून घ्या

  2. 2

    मुटके / गोळे तयार

  3. 3

    4 कप पाणी उकळून घ्या, त्यात मीठ, हळद, दही, तेल घालून उकळी येऊ द्यावी. आता त्यात तांदूळ भिजलेला घाला, उकळी आली की गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवा व 70% शिजवून घ्या

  4. 4

    आता तयार गोळे त्यात घालून घ्या व हलक्या हाताने दाबा. आता त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यावे.

  5. 5

    तडका :- तेल, मोहरी, जीरे, कढीपत्ता, कोथिंबीर घालून तडका करा, तडका तयार

  6. 6

    मसाला ताक:- आंबट दही, हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, जीरे पूड, मीठ, पाणी गरजे नुसार मिक्सर चा भांड्यात घालून फिरवून घ्या. नंतर गाळून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

  7. 7

    तडका घालून गोळा भात सर्व्ह करा व त्या बरोबर मसाला ताकाचा आस्वाद घ्यावा

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes