ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ccs
#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर
#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे.

ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)

#ccs
#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर
#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 2 वाट्याआख्खा मसूर
  2. 4कांदे बारीक चिरलेले
  3. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  4. 2 टीस्पूनबारीक चिरलेली लसूण
  5. 2 टीस्पूनकाश्मीरी लाल तिखट
  6. 1 टीस्पूनघरगुती मसाला
  7. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  8. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  9. 2सुक्या मिरच्या
  10. 4कोकम/आमसूलं
  11. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  12. कोथिंबीर बारीक चिरलेली
  13. 2 टीस्पूनजीरे
  14. 1 टीस्पूनहिंग
  15. कडिपत्ता
  16. 4 टेबलस्पूनतेल
  17. 2 टेबलस्पूनमलाई

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    अख्खा मसूर रात्री भिजून ठेवून सकाळी उपसून घेतला. फोडणीसाठी कुकरमधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात जीरे घालून तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट पूड आणि मीठ घालून परतून घेतले.

  2. 2

    भिजवलेला अख्खा मसूर, ४ कोकम आणि पाणी घालून मिक्स केले. झाकण लावून एक शिटी काढून मसूर शिजवून घेतला.

  3. 3

    शिजलेल्या अख्खा मसूरला परत वरुन चमचमीत फोडणी देण्यासाठी कांदा आणि लसूण बारीक चिरले. कढई मधे तेल घालून त्यात जीरे तडतडल्यावर कडिपत्ता पाने, सुक्या मिरच्या आणि बारीक चिरलेली लसूण घालून ब्राऊन होईपर्यंत परतले मग कांदा घालून खरपूस परतला नंतर त्यात घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून परतले.

  4. 4

    मसाले करपू नये म्हणून त्यात शिजलेल्या मसूर मधले थोडे पाणी घातले मग त्यात कसूरी मेथी आणि घरची २ टेबलस्पून मलाई घालून मिक्स केले. कसूरी मेथी आणि मलाई घातल्यामुळे ढाबा स्टाईल टेस्ट येते.

  5. 5

    वरील ढाबा स्टाईल फोडणी शिजवलेल्या अख्खा मसूर मधे घालून मिक्स केली. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.

  6. 6

    मस्त चमचमीत ढाबा स्टाईल गरमागरम अख्खा मसूर सर्व्ह करताना कांदा रिंग्ज आणि लिंबाची फोड ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes