अख्ख्या गवार भाजी सावजी स्टाईल (gavar bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#Trending_recipe ....... ....... 😋👉
नागपूर सावजी स्पेशल चमचमीत तर्रीदार... 𝙂𝙖𝙫𝙖𝙧 𝙗𝙝𝙖𝙟𝙞
अख्खा गवार....सावजी स्टाईल👍👍😋😋😋
विदर्भ म्हंटलं की ब-याचशा झक्कास भाज्यांचे नांवे पुढे येतात आणि त्यातल्याच खूप प्रसिद्ध असलेल्या सावजी भाज्या मग त्या व्हेज असाे की नाॅनव्हेज सगळ्या कशा एका पेक्षा एक सरस आणि झणझणीत.
आज मी घरी सावजी पद्धतीची चमचमीत #अख्खागवार भाजी बनवलेली आहे ,
जी नागपूरला खासकरून सावजींच्या लग्नप्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात, स्पेशली माझ्या घरी गणपतीच्या जेवणात बनवलेली जाते,
अख्ख्या गवार भाजी ही 😋खूप चमचमीत तर्रीदार तर असतेच पण चवीला अप्रतिम असते. 😋😋😋
....#Jyotshnaskitchan🤗👉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1 पावगवार
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1 वाटीकोथिंबीर
  5. 1 वाटीशेंगदाणे
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनजीरे पूड
  10. चिमुटभरहिंग
  11. 1 टेबलस्पूनधणेपूड
  12. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  13. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  14. चवीनुसारमीठ
  15. 2फळी फोडणी करीता तेल
  16. 1 टेबलस्पून२ हिरव्या मिरच्या+आले+लसूण+कोथिंबीर पेस्ट

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून द्यावे, गवार स्वच्छ धुवून पाण्यात मीठ टाकून ५ मिनिटे उकळून घ्यावे, व शेंगदाणे थोडे भाजुन घ्यावे

  2. 2

    भाजलेल्या शेंगदाण्याचे साल काढून मिक्सर ला फिरवून बारीक कुट करून द्यावे, नंतर एका कढईत तेल टाकून गरम करून त्यात जीरे मोहरी टाकून नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावे

  3. 3

    नंतर उकळून घेतलेला गवार टाकून तेलात छान २ मिनिटे परतून घ्यावा व नंतर आले लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या ची पेस्ट टाकून ५ मिनिटे झाकून ठेवावे

  4. 4

    नंतर वरील सर्व मसाला पावडर घालून मिक्स करून द्यावे व टोमॅटो आणि मीठ टाकून छान मिक्स करून द्यावे

  5. 5

    नंतर ५ मिनिटे झाकून वर पाणी ठेवावे, व ५ मिनिटा नंतर शेंगदाणे चा बारीक कुट टाकून छान मिक्स करून द्यावे

  6. 6

    नंतर झाकणात ठेवलेले गरम पाणी टाकून ६ ते ७ मिनिटे मंद आचेवर झाकुन ठेवावे व मध्ये मध्ये चेक करत राहावे, नंतर गवार छान शिजली की कोथिंबीर घालून मिक्स करून द्यावे आणि सर्व्हिंग डिश मध्ये काढून पोळी बरोबर सर्व्ह करावे खूप चविष्ट लागते या पद्धतीची गवार भाजी😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes