लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)

#ks5
मराठवाड्यातील एक चटपटीत तोंडीलावणे...
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#ks5
मराठवाड्यातील एक चटपटीत तोंडीलावणे...
कुकिंग सूचना
- 1
लसूण कोथिंबीर बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण घालून लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून बाजूला काढून ठेवा त्याच तेलात कोथिंबीर घालून परतून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
- 2
पॅनमध्ये तेल घालून त्यात शेंगदाणे कूट भाजून घ्या खोबरं घालून भाजून घ्या.(मी येथे डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे माझ्याकडे खोबरे नसल्यामुळे) तीळ तिखट घालून एकत्र करावे लसूण आणि कोथिंबीर घालून एकत्र मिक्स करावे परतून घ्यावे.
- 3
चवीनुसार मीठ आमचूर पावडर घालून एकत्र करावे आणि गॅस बंद करावा.पॅनमधील मिश्रण थोडे थंड झाले की त्यात साखर घालून एकत्र करावे.जर लसूण भुरका जास्त तेलकट वाटत असेल तर एका गाळण्यात काढून ठेवावे त्यामुळे जास्तीचे तेल बाजूला निघेल.
- 4
तयार लसूण भुरका भाकरी पोळी भाताबरोबर तोंडीलावणे म्हणून सर्व्ह करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
#लसूणमस्त चमचमीत आणि झणझणीत काहीतरी जेवताना हवच असतं....त्यासाठी हा खास पदार्थ....झणझणीत लसूण भुरका...अगदी झटपट होणारा..... Supriya Thengadi -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 लसणाचा भुरका हा मराठवाड्यातला एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. भात,पोळी,भाकरी कशाबरोबर ही खाता येतो. मला हे नावच खूप आवडलं. म्हणून म्हंटलं करुन बघुया हा प्रकार. मस्त झणझणीत झालाय लसूण भुरका. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 थीम : ५ - मराठवाडारेसिपी - ४मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
-
चटकदार लसूण भुर्रका (lasun bhurka recipe in marathi)
#KS3विष्णुजींची रेसिपी व माझी मैत्रीण शीतल राऊत हिची रेसिपी पाहून प्रथमच थोडा बदल करून हा पदार्थ केलाय चव अप्रतिम आहेच व जिभेची चव वाढवणारा हा पदार्थ खूप आवडला Charusheela Prabhu -
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
लसूण भुरका (Lasun Bhurka Recipe In Marathi)
#JPRलसूण भुरका हा असा एक प्रकार आहे जो तयार करून ठेवला तर बऱ्याच प्रकारे वापरता येतो आणि पटकन तयार होणारा असा हा प्रकार आहे जो नेहमीच आपल्याला भाजीची उणीव जाणवू देत नाही.महाराष्ट्रातील विदर्भात हा भुरका प्रत्येक घरात बघायला मिळेल, खिचडीवर हा भुरका घालून खाल्ला जातो भाकरीबरोबर हा तेल टाकून खाल्ला जातो.हा बऱ्याच प्रकारे आपल्याला वापरता येतो मी वडापाव मध्ये लावण्यासाठी तसेच गार्लिक ब्रेड तयार करताना भुरका का वापरत असते. वरण भात, भाकरी, पोळी बरोबर ही भुरका छान लागतो.मे महिन्यात पहिल्यांदाच मुंबईला पाहण्यात आले यावर्षी की मिरची वीस रुपयाला फक्त चार किंवा पाच मिळत आहे जी मिरची भरपूर भाज्या घेतल्यावर फ्री मध्ये मिळत होती त्या मिरचीचा अचानकच भाव वाढला. म्हणून माझ्या बाबांनी गावावरून मला भरपूर मिरच्या पाठवलयांत्यातला काही मिरच्या लाल झाल्यावर त्यांना छान वाळून घेतले आणि त्यापासून भुरका तयार केला.रेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला. Chetana Bhojak -
लसूण झुरका..मराठवाडा स्वाद (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा रेसिपीज #लसूण_झुरका लसूण झुरका..मस्त चटपटीत झटपट होणारं तोंडी लावणं..पहिल्यांदाच केली ही रेसिपी.. खूप आवडली मला ..😋😋झुरका,भुरका,भुरकी..किती छान नाव दिलीत ...आमच्याकडे माझी मामी खुरासणीची म्हणजे कारळ्याची चटणी करते त्या चटणीला भुरकी म्हणतात..😋 Bhagyashree Lele -
गाजर कांदा सॅलाड / कोशिंबीर (gajar kanda salad recipe in marathi)
हे आपण तोंडीलावणे म्हणून सर्व्ह करू शकता. Rajashri Deodhar -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला. Nanda Shelke Bodekar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
मराठवाडा स्पेशल वारंगा खिचडी (Varanga khichdi recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील वारंगा फाट्यावरील सुप्रसिद्ध kalpana Koturkar -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे. Rajashri Deodhar -
-
लसूण भेंडी (lasun bhendi recipe in marathi)
बरेच जण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून खात नाहीत. पण या पद्धतीने करुन पहा. तुम्हाला नक्की आवडेल.मी या भाजीला कांदा घालत नाही. Archana bangare -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar -
पुडाची वडी (सांबार वडी) (Pudachi vadi recipe in marathi)
ही विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ आहे. घराघरात पुडाची वडी बनवली जाते. अतीशय चटपटीत पदार्थ आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा Rupali Atre - deshpande -
-
तिखट गोड उपवासाची कचोरी / पनीर खोबरा कचोरी (ऑईल फ्री) (upwasachi kachori recipe in marathi)
#fr तिखट गोड उपवासाची कचोरी / पनीर खोबरा कचोरी (ऑईल फ्री) ही रेसिपी मी दोन्ही पद्धतीने केली एक तळून आणि एक आप्पे पात्रात.... दोन्ही पद्धतीने कचोरी खूप छान झाली घरी सगळ्यांना आवडली. Rajashri Deodhar -
पेंडा डाळ (penda dal recipe in marathi)
#KS5: मराठवाड़ा स्पेशल पेंडा डाळ बनवला अगदी सोप्पी स्वादिष्ट आणि प्रोटीन नी भरपूर आहे. म चला मी ही डाळ बनवते. Varsha S M -
पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
#WWRचटपटीत असे हे पंचामृत नैवेद्याच्या पानांमध्ये डाव्या बाजूला वाढतात. Shital Muranjan -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची रेसिपी मध्ये आधी मी शेंगोळे केले,आता दुसरा पदार्थ काय करावा विचार करत होते तेवढ्यात भुरका आठवला...आपण लोणचं,ठेचा व चटणी खातो,तशाच पद्धतीने भुरका खायचा... म्हणजे तोंडी लावण्यासाठी..थोडा तिखट असतो पण पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागतो..साधं वरण,भुरका वांग्याचे भरीत व पोळी/भाकरी खूप छान लागते.. करून पाहा...4-5 दिवस टिकतो फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही... Mansi Patwari -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशीला चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
खोबरे लसूण चटणी (khobra lasun chutney recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील किवर्ड कोकोनट आहे. ह्याची ही ही सुंदर नेहमी खावीशी वाटणारी चटणी.आमची आजी ही चटणी फार बेस्टच बनवायची. Sanhita Kand -
ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात ओली लसूण पात अगदी ताजी आणि भरपूर प्रमाणात मिळते. या लसणीच्या पातीचा स्वाद, चटणी मध्ये खूप छान लागतो. शेंगदाण्याबरोबर, सुक्या खोबऱ्याबरोबर ही पात घातलेली चटणी खूप छान लागते. आज मी केली आहे शेंगदाणा बरोबर.चटणी करून नक्कीच पहा. कुठल्याही पराठ्याबरोबर, भाकरी बरोबर छान लागते. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या