बटाट्याची भाजी (batatya chi bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#pe
बटाटा हे कंदमुळं आपल्या गुहिणीसाठी उपयुक्त आहे. बटाटा आपण कुठल्याही पदार्थात वापरू शकतो. बटाटा लहान मोठ्या सगळ्यांना आवडतो आणि तो पौष्टिक सुद्धा आहे.

बटाट्याची भाजी (batatya chi bhaji recipe in marathi)

#pe
बटाटा हे कंदमुळं आपल्या गुहिणीसाठी उपयुक्त आहे. बटाटा आपण कुठल्याही पदार्थात वापरू शकतो. बटाटा लहान मोठ्या सगळ्यांना आवडतो आणि तो पौष्टिक सुद्धा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20- 25 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 300 ग्रॅमबटाटे
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 5-6कढीपत्त्याची पाने
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 2 टेबलस्पून लाल तिखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनरवा
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंबीर
  12. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

20- 25 मिनिटे
  1. 1

    बटाट्याची साले काढावीत.एका बटाट्याचे चार भाग करून पातळ चकत्या करून पाण्यात टाकून ठेवावे.

  2. 2

    कढईत तेलाची फोडणी करून त्यात मोहरी,जीरे, हिंग,कढीपत्त्याची पाने टाकावीत.नतर कांदा टाकावा.

  3. 3

    नंतर बटाट्याच्या चकत्या टाकाव्यात. हळद टाकून मिक्स करून.हाताने पाण्याचा शिपका द्यावा व मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावी.

  4. 4

    नंतर लाल तिखट, धणेपूड मीठ टाकून परतून घ्यावे. मधूनच झाकण काढून भाजी हलवावी.फोडी मऊ झाल्यावर त्यात रवा टाकून एक वाफ देऊन खाली उतरवावी.

  5. 5

    बटाट्याची भाजी पोळी बरोबर, ब्रेड स्लाइस किंवा वरण भाता सोबत खाण्यास द्यावी.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes