पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#काॅम्बो रेसिपी
#cr

पुरी भाजी सगळ्यांनाच आवडते.काही विशेष असेल तर आपण करतोच . माझ्या मुलीला खूप आवडते.चला तर मग बघूया

पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)

#काॅम्बो रेसिपी
#cr

पुरी भाजी सगळ्यांनाच आवडते.काही विशेष असेल तर आपण करतोच . माझ्या मुलीला खूप आवडते.चला तर मग बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ -३५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. ४०० ग्रॅम बटाटे उकडून कुस्करून
  2. 1 छोटाकांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनआल्याचे तुकडे
  6. 5-6कढीपत्त्याची पाने
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनजीरे पावडर
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. मीठ चवीनुसार
  13. पाणी आवश्यकतेनुसार
  14. 2 कपकणीक

कुकिंग सूचना

२५ -३५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन उकडून कुस्करून घ्यावे किंवा बारीक चिरून घ्यावेत.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात जीरे हिंग फोडणी करावी.नंतर त्या मध्ये आलं कढीपत्त्याची पाने टाकून परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये कांदा टाकून मिक्स करून सर्व मसाले टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावे व पाणी घालून एक उकळी आणावी.

  5. 5

    उकळी आल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्यात व पाच मिनिटे शिजू द्यावे

  6. 6

    नंतर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे

  7. 7

    कणिक थोडं घट्ट सर मळाव व अर्धा तास बाजूला ठेवून नेहमी प्रमाणे पुऱ्या लाटून घ्याव्यात.

  8. 8

    कढईत तेल तापवून पुऱ्या तळून घ्याव्यात.

  9. 9

    गरमागरम पुरी भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes