चपाती रोल अँड एग शेजवान चीज चपाती पिझ्झा (chapati roll/ egg schezwan cheese recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. (Amazing benefits of eating three eggs in a day)
#Pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
2 ते 3 जण
  1. 3अंडी
  2. 3चपाती
  3. 1छोटी सिमला मिरची
  4. 1 छोटाटोमॅटो
  5. 1 छोटाकांदा
  6. कोथिंबीर
  7. 1चीज ट्यूब
  8. अमूल बटर आवश्यतेनुसार
  9. 1छोटी हिरवी मिरची
  10. 1/2 चमचालाल तिखट
  11. चिमूटभरकाळीमिरी पूड
  12. चिमूटभरचाट मसाला
  13. कोबी सजावटी साठी

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या बारीक कापून मिक्स करून घ्यावा.

  2. 2

    मग एका बाउल मध्ये दोन अंडी फोडून त्यात वरील अर्धा भाज्या मिक्स करून थोडं चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, चांगलं ढवळून घ्यावे.

  3. 3

    गॅस वर पॅन ठेवून एक गोळी लाटून घ्यावी व ती पॅन वर टाकून 1 बाजू पूर्ण भाजून व 1 बाजू अर्धी भाजून घ्यावी.

  4. 4

    मग चपाती बाजूला काढून त्यात बटर पॅन वर फिरवून वरील अर्ध मिश्रण पॅन वर ओतावे व अर्धी पोळी शिजल्यावर वरून पूर्ण भाजलेली बाजू ऑम्लेट वर ठेवावी.

  5. 5

    व पूर्ण झाकून 2 मिनिट ठेवून मग पुन्हा चपाती परतावी. व त्याचा रोल करावा. एग चपाती रोल गरमा गरम तयार. दुसऱ्या चपाती same करून घ्यावी. हवं असल्यास त्याचे छोटे पीस करावेत. एग चपाती रोल तयार.

  6. 6

    एग शेजवान चीज पिझ्झा बनविण्यासाठी साठी वरील सारख्या पायऱ्या अवलंबून मग चपाती वरील एग ला शेजवान सॉस लावून घ्यावा. मग वरून कोबी एक सारखा सर्वत्र भुरभुरावात. मग वरून चीज किसून टाकावेत.

  7. 7

    2 मिनिट वाफेवर ठेवावे मग वरून चाट मसाला व कोथिंबीर टाकावी. पिझ्झा कटर च्या साहाय्याने कट करावेत अश्या प्रकारे एग शेजवान चीज पिझ्झा तयात.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

Similar Recipes