बटाट्याचा फराळी चिवडा (Batatyacha Farali Chivda Recipe In MarathI)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#pe बटाटा हे कंद भाजी आपल्या सगळ्यांच्याच आवडीची व प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असणारी हो पण ह्या बटाटयाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत ते म्हणजे बटाटयात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम अतिशय योग्य प्रमाणात असते. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बटाट्यातील स्टार्च मुळे आपल्या शरीरातील पिष्टमय पदार्थाची कमतरता भरून येते. संधिवातावर बटाट्याचा लेप गुणकारी आहे. अशक्तपणावर गुणकारी, भुक वाढते, शक्ति भरून येते. सर्दी, तोंड येणे, जुनाट खोकला, किडनीच्या समस्यावर प्रभावी तसेच गजकर्ण, चेहऱ्यावरील डागावर व भाजलेल्या जखमांवर ही गुणकारी अशा पौष्टीक बटाट्या पासुन बनवलेला बटाट्याचा किस ( वाळवणाचा प्रकार ) त्याचा फराळी चिवडा कसा करायचा चला तर आपण पाहुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. ३० ग्रॅम बदाम
  2. ३० ग्रॅम काजु
  3. ३० ग्रॅम मनुका
  4. 2-3मिरच्या
  5. 5-6कडिपत्याची पाने
  6. 1 टीस्पून तिखट
  7. 1-2 टीस्पून काळ मीठ
  8. 2-3 टेबलस्पुन पिठि साखर
  9. 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  10. चविनुसार मीठ
  11. २०० ग्रॅम तेल किंवा तुप
  12. १५० ग्रॅम बटाट्याचा वाळवलेला किस
  13. ५० ग्रॅम शेंगदाणे

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    बटाट्याचा फराळी चिवडा बनवण्याचे साहित्य बाऊलमध्ये काढुन ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर थोडा थोडा बटाटयाचा किस तेलात टाकुन तळुन प्लेटमध्ये काढुन ठेवा

  3. 3

    नंतर गरम तेलात शेंगदाणे, बदाम, काजु तळुन प्लेटमध्ये काढा

  4. 4

    बाउलमध्ये पिठिसाखर तिखट व काळामिठ मीठ मिक्स करून ठेवा व गरम तेलात मनुका मिरच्या कडिपत्ता तळुन प्लेट मध्ये काढुन ठेवा

  5. 5

    तळलेला अर्धा किस बाऊलमध्ये घेऊन त्यात तळलेले अर्धे पदार्थ मिक्स करा त्यातच वरील मसाला मिक्स करा आपला तिखट फराळी चिवडा रेडी

  6. 6

    दुसऱ्या बाऊलमध्ये किस व इतर तळलेले पदार्थ मिक्स करा त्यात जिरेपावडर काळमिठ मीठ मिक्स करून लहान मुलांसाठी फिक्का फराळी चिवडा रेडी

  7. 7

    थोडया बटाटा साबुदाणा चकल्या सोबत तळुन काढुन ठेवा

  8. 8

    वेगवेगळ्या प्लेटमध्ये तिखट फराळी चिवडा, फिक्का मुलांसाठी केलेला चिवडा, व तळलेल्या बटाटा साबुदाणा चकल्या ठेवुन डिश सर्व्ह करा

  9. 9

    घरातील लहान मोठ्या सर्वांसाठी बटाटयाचा फराळी चिवडा बनवुन देता येतो (बटाट्याचा वाळवलेला किस वर्षभर आपल्याला वापरता येतो)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes