शेंगदाणा दाळवा चिक्की (shengdana dalva chikki recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS6 #जत्रास्पेशल... आम्ही मोर्शी ला असताना सालबर्डी च्या यात्रेला जायचं... त्यावेळी आम्ही शेंगदाणा आणि डाळवा अशी मिक्स साखरेची चिक्की घ्यायचं ...खूप आवडायची आम्हाला ते ...म्हणून मी आज तिच चिक्की बनवली आहे.. आणि आणखी एक... आज जी चिक्की बनवली आहे, तिच्यामध्ये साखरेचा वापर न करता , साखरेच्या ज्या गाठया शिल्लक होत्या घरी, गुढीपाडव्यासाठी आणलेल्या, त्याच बारीक करून वापरलेले आहे... साखरेऐवजी... त्यामुळे आणखी थोडी वेगळी चव आली आहे त्याची ...
शिवाय शिल्लक असलेल्या गाठ्यांचा वापरही झाला...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
  1. 1 वाटीसाखरेच्या गाठीचा चुरा
  2. 1/2 वाटीभाजलेले शेंगदाणे
  3. 1/2 वाटीडाळवा
  4. 1 टीस्पूनतूप
  5. 1/2 वाटी पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    साखरेची गाठी बारीक करून घ्यावी. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावीत.

  2. 2

    आता गॅस वर एका पॅन मध्ये तूप टाकून गरम झाल्यावर त्यात गाठीचा चुरा टाकावा. 1/2 वाटी पाणी टाकावे.

  3. 3

    पाक चांगला दोन तारी झाला, की त्यात शेंगदाणे आणि डाळवा टाकावा. आणि मिक्स करून घ्यावे. गॅस बंद करावा. आता हे तयार मिश्रण,तेल लावलेल्या ताटात ओतावे.

  4. 4

    सारखे करून थंड होऊ द्यावे. 10 मिनिटांनी त्याची पापडी/ चिक्की तयार झालेली असेल. आता तिचे हातानेच तुकडे पडतात. आणि छान खुसखुशीत होते ही चिक्की.. दाताला बिलकुल चिकटत नाही. यात मी साखरेचे प्रमाण कमी केले आहे. आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes