रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#rr
#रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी
आज रविवार त्याच्यामुळे स्पेशल मेनू असतो आमच्याकडे. पण यामुळे भाजी चां प्रॉब्लेम होता. घरी कांदे-बटाटे असतातच, मग काय आठवली एका रेस्टॉरंट मध्ये खाल्लेली बटाट्याची कोफ्ता करी इन कोकोनट मिल्क.ही भाजी इतकी भन्नाट झाली की वाटले रेस्टॉरंट मधून पार्सल आलंय.खूप छान रेसिपी आहे यात शंकाच नाही. या भाजीला मी हेल्दी वर्जन दिलेला आहे म्हणजे मी आप्पे पात्र होते भाजलेले आहेत.

रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी (kofta curry recipe in marathi)

#rr
#रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी
आज रविवार त्याच्यामुळे स्पेशल मेनू असतो आमच्याकडे. पण यामुळे भाजी चां प्रॉब्लेम होता. घरी कांदे-बटाटे असतातच, मग काय आठवली एका रेस्टॉरंट मध्ये खाल्लेली बटाट्याची कोफ्ता करी इन कोकोनट मिल्क.ही भाजी इतकी भन्नाट झाली की वाटले रेस्टॉरंट मधून पार्सल आलंय.खूप छान रेसिपी आहे यात शंकाच नाही. या भाजीला मी हेल्दी वर्जन दिलेला आहे म्हणजे मी आप्पे पात्र होते भाजलेले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 2मोठे उकडलेले बटाटे
  2. 1/4 वाटीअरारोट
  3. 1 वाटीनारळाचे दूध
  4. 1 टेबलस्पूनटोमॅटो पावडर सर्वप्रथम एका पॅनमध्ये
  5. 1मिडीयम साईज कांदा
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1/2 टीस्पूनकिसलेले आले
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनधने पावडर
  10. 1/4 टीस्पूनजीरे पावडर
  11. 6काळी मिरी
  12. 1दालचिनीचा तुकडा
  13. 1मोठी विलायची
  14. 2छोटी विलायची
  15. 3लवंगा
  16. 1चक्रीफुल
  17. 2तेज पान
  18. 1 टेबलस्पूनकाजू
  19. 1 टेबलस्पूनकिसमिस
  20. 1/2 टेबलस्पूनटेबल्स्पून मगज बिया
  21. 1 टेबलस्पूनबटर
  22. 1 टीस्पूनतेल
  23. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  24. 1/2 टीस्पूनसाखर
  25. 2थेम्ब ऑरेंज कलर
  26. स्वादानुसारमीठ

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    कांद्याच्या मोठ्या फोडी कापून घ्या. मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या. कोथिंबीर बारीक कापून घ्या. चार-पाच काजूचे तुकडे बारीक करून घ्या. एका छोटे पराती त बटाटे कुस्करून घ्या.

  2. 2

    आता गॅसवर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून यात एक तेज पान मोठी विलायची छोटी विलायची, कलमी चा तुकडा तेलात परतून घ्या. आता यात कांद्याच्या फोडी टाका. काजू टाका,मागाज बिया टाका व परतून घ्या व यात अर्धी टोमॅटो पावडर टाका. सर्व पणत्या यात थोडे पाणी टाका चांगले शिजू द्या. कांदा ट्रान्सपरंट झाल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.

  3. 3

    आता एका पराती मधे कुस्कारलेले बटाटे टाका,आता यात आरारोट टाका मीठ टाका,काळे मिरे पावडर टाका.चांगले मिसळा.यातला थोडा भाग वेगळा काढा.या छोट्या भागात उरलेली टोमॅटो पावडर घाला.ऑरेंज रंग घाला.आता या रंगाचे छोटे छोटे बॉल्स करा.बॉल्स क्या मध्ये काजू तुकडा व किसमिस भरा.आता मोठ्या गोळ्या चे थोडे मोठे बॉल्स करा यात ऑरेंज बॉल स्टफ्फ करा.हा बॉल आरारोट मध्ये घोळा.

  4. 4

    अशाप्रकारे सर्व बॉल्स आरारोट मध्ये करून घ्या. आता गॅस आपटे पत्र ठेवा त्यात थोडं तेल लावा. यात हे कॉफ्टे ठेवा. हे कोणते चांगले लालसर भाजून घ्या.

  5. 5

    आता गॅसवर एका पॅनमध्ये बटर घाला. या तेज पान टाका. आता यात बारीक केलेली ग्रेव्ही टाका चांगले परतून घ्या.बाजूने तेल सुटत आले की यात धने पावडर,जीरे पावडर,तिखट,मीठ व साखर घाला.चांगले परतून घ्या.यात थोडे पाणी घाला.ही ग्रेव्ही घट्टच ठेवा.आता यात नारळ दूध घाला.मिसळून घ्या.एक मिनिटात गॅस बंद करा.

  6. 6

    आता सर्व्ह करताना प्लेट मध्ये प्रथम ग्रेव्ही टाका त्यावर कॉफ्ते ठेवा.वरून नारळ दूध घाला.काजू किसमिस व कोथिंबीर घालून पराठे,नान सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes