आलू बोंडा रस्सा (aloo bonda rassa recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

आलू बोंडा रस्सा हा विदर्भातील प्रसिध्द पदार्थ आहे.जसा मुंबईत बटाटा वडा- पावासोबत खाल्ला जातो तसेच विदर्भात आलू बोंडा म्हणजेच बटाटा वडा झणझणीत पातळ चण्याच्या उसळीसोबत ज्याला रस्सा किंवा तर्री म्हणतात खाल्ला जातो.

आलू बोंडा रस्सा (aloo bonda rassa recipe in marathi)

आलू बोंडा रस्सा हा विदर्भातील प्रसिध्द पदार्थ आहे.जसा मुंबईत बटाटा वडा- पावासोबत खाल्ला जातो तसेच विदर्भात आलू बोंडा म्हणजेच बटाटा वडा झणझणीत पातळ चण्याच्या उसळीसोबत ज्याला रस्सा किंवा तर्री म्हणतात खाल्ला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
2 -3 व्यक्ती
  1. 1 कपगावरान हरबरे(चणे)
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. १०- १२ लसुण पाकळ्या,
  4. १ ईंच आल, हिंग
  5. 1/4 कपसुक्या खोबऱ्याचे काप किंवा किस
  6. मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  7. 1 टीस्पूनधणे,
  8. 1 टीस्पून लाल तिखट,
  9. 1 टीस्पूनजीरे ,
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 2हिरव्या मिरच्या,
  12. कोथींबीर
  13. 3/4 कपबेसन
  14. तेल
  15. 1 टीस्पून काळा मसाला
  16. फोडणी साठी
  17. मोहरी,
  18. कमाल पत्र,
  19. लवंगा,
  20. २-३ काळे मिरे

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    रात्री किंवा७-८ तास चणे भिजत घालावे.सकाळी भिजलेले चणे कूकर मध्ये छान मऊ शिजवून घ्यावे.(३-४ शिट्ट्या). रस्स्या साठी लागणारे सामान जमा करावे. १ कांदा कापून घ्यावा.

  2. 2

    आता कढईत १ टि.स्पुन तेल घालून कापलेला कांदा लालसर परतून घ्यावा, कांदा लाल झाल्यावर खोबरेकाप, धणे, जिर घालून परत छान लालसर परतून घ्यावे व काढून थंड होऊ द्यावे

  3. 3

    थंड मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालावे त्यातच ५-६ लसूण पाकळ्या वआलं घालावे व पाणी घालून पेस्ट करून घ्यावी

  4. 4

    गॅसवर कढईत १ मोठा चमचा तेल घालावे, तेल गरम झाल्यावर १ कमाल पत्र,२ लवंगा २-३ मिरे घालावे. हिंग घालावे नंतर तयार पेस्ट घालावी, लाल तिखट,हळद,मीठ घालावे व तेल सुटे पर्यंत परतावे

  5. 5

    तेल सुटल्यावर बेसन घालुन परत परतावे,नतंर चणे घालावे, काळा मसाला घालावा, पाणी घालून २-३ मिनिट उकळू द्यावे.कोथीबींर घालावी. झाला रस्सा तयार

  6. 6

    आलू बोंड्यासाठी प्रथम बटाटे छान बारीक कुस्करून घ्यावे.लसूण ठेचून ध्यावा.फोडंणीसाठी कढईत तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यावर जीरे घालावे, लसूण घालावा

  7. 7

    लसूण लालसर झाल्यावर हिरवी मिरची,कडीपत्ता,१/२ टि.स्पुन लाल तिखट,हळद, मीठ, बटाटे घालून परतून घ्यावे, कोथीबींर घालावी व एक वाफ येऊ द्यावी. झाला आलूबोंड्याचा मसाला तयार,तयार मसाल्याचे छोटे छोटे गोळे करावे

  8. 8

    आता एका भांड्यात बेसन घ्यावे.त्यात चवीनुसार मिंठ, १/२ ओवा, चिमूटभर खायचा सोडा घालावा व पाणी पातळ सर पिठ करून घे, (खूप पातळ नसावे)

  9. 9

    तळण्यासाठी तेल गरम करावे, बटाट्याचा गोळा बेसन पिठात बुडवून,तेलात सोडावा. मध्यम आचेवर सर्व आलूबोंडे तळून घ्यावे.

  10. 10

    सर्व्ह करतांना डीश मंध्ये आलूबोंडे ठेवावे, त्यावर भरपूर गरम रस्सा घालावा, वरून बारीक चिरलेला कांदा, शेव घालावी, सोबत एका वाटीत रस्सा द्यावा.मस्त गरम गरम आलूबोंडे खावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes