आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण (ambatgod chaviche phodniche varan recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

#दालरेसिपिज #dr
वरण भात हा माझा व माझ्या मुलीचा आवडीचा पदार्थ रोज जेवणात वरण भात हे हवेच मग ते वरण फोडणीचे असो किंवा साधे असो तर आज आपण आंबटगोड चवीचे वरण आज करणार आहेत चला अत्ता रेसिपी कडे वळुयात. #purnabramharasoi

आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण (ambatgod chaviche phodniche varan recipe in marathi)

#दालरेसिपिज #dr
वरण भात हा माझा व माझ्या मुलीचा आवडीचा पदार्थ रोज जेवणात वरण भात हे हवेच मग ते वरण फोडणीचे असो किंवा साधे असो तर आज आपण आंबटगोड चवीचे वरण आज करणार आहेत चला अत्ता रेसिपी कडे वळुयात. #purnabramharasoi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 जणान करता
  1. 1 वाटी तु. डाळ
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1/2 टीस्पूनहिंग
  4. जीरे ,
  5. मोहरी
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 5-6 कडीपत्ता पाने
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टोमॅटो चिरुन
  10. 2हिरव्या मिरची तुकडे करून
  11. 5-6 लसुण पाकळ्य
  12. 1 इंचआदरक
  13. खोबरे
  14. कोथिंबीर आवडीने

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला तुर डाळ धुऊन त्यात हळद, हिंग व पाणी घालून कुकरला लावुन घेणे. कुकरला 3 शिट्या करुन घेणे.

  2. 2

    साधारण 1छोटी वाटी डाळीला मोठी 1.5 वाटी पाणी घालावे

  3. 3

    लसुण, खोबरे, आदरक कोथिंबीर वाटुन घ्यावे. ओले नारळ नसेल तर सुखे खोबरे वापरावे

  4. 4

    कुकरच्या 3 शिट्या झाल्या की कुकर बंद करावे गार झाला की त्यातील डाळीचा डबा काढून घ्यावा.

  5. 5

    डाळ रवीने हाटुण घ्यावी.

  6. 6

    सर्व साहित्य जवळ घ्यावे

  7. 7

    पातेल्यात तेल घालून सुरवातीला मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची तुकडे, लसुण खोबरे पेस्ट, हळद, टोमॅटो 🍅घालुन परतुन घ्यावे.

  8. 8

    आत्ता त्यात थोडेसे मीठ घालावे.

  9. 9

    हाटुण घेतलेली डाळ घालावी थोडे पाणी घालावे एकसारखे हालवावे

  10. 10

    गुळाचा खडा घालून एक दोन उकळी येऊन दयावी चव बघावी....

  11. 11

    कोथिंबीर खिसलेला खोबरे घालावे.

  12. 12

    तयार आहे आपले आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes