फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#dr
तुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण...

फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)

#dr
तुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
२-३
  1. 1 कपतुरीची शिजवलेली डाळ
  2. 2 टीस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनमोहरी
  4. १/८ टीस्पून हिंग
  5. 5-6कडीपत्ता पाने
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1-2हिरव्या मिरच्या
  8. 2-3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. १-१/२ कप पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    तुरीची शिजवलेली डाळ, चिरलेला टोमॅटो,कोथिंबीर,मिरची,कडीपत्ता पाने घेतली.

  2. 2

    कढईत तेल तापल्यावर मोहरी घालुन तडतडू दिली.त्यात हिंग,कडीपत्ता पाने,हळद घालून नंतर चिरलेला टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घालून लगेच मिक्स केले.

  3. 3

    आता त्यात पलिभर शिजवलेली डाळ घालून छान घोटून घेतले.म्हणजे फोडणी,टोमॅटो,डाळ सगळ छान एकत्र मिळून येतं आणि वरणाला मस्त स्वाद येतो.

  4. 4

    आता बाकीची डाळ,कोथिंबीर,मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स केले.आणि मस्त उकळी आणली.शेवटी वरून पण थोडी कोथिंबीर घातली.

  5. 5

    वरण खाण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतले.भातासोबत, पोळीसोबत भन्नाट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes