मँगो मूस (mango mousse recipe in marathi

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन week : 1
आंब्याचा कमी साहित्यातून, झटपट होणारा पदार्थ आहे. खूप छान चवीला.

मँगो मूस (mango mousse recipe in marathi

#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन week : 1
आंब्याचा कमी साहित्यातून, झटपट होणारा पदार्थ आहे. खूप छान चवीला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपव्हिपिंग क्रिम किंवा फ्रेश क्रिम
  2. 1आंबा
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टेबलस्पून फ्रेश क्रिम घेतली तर, त्यात पिठीसाखर घालावी

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम व्हिपिंग क्रिम बिटरने फेटून घ्यावी.हलकी होई पर्यंत 5मिनिटे फेटून घेणे.

  2. 2

    आंब्याची साल काढून, फोडी करून घेणे.सजावटीसाठी 2 टेबलस्पून तुकडे बाजूला काढून ठेवणे. मिक्सरमधुन साखर घालून रस करून घेणे.

  3. 3

    फेटलेल्या क्रिम मधून साधारण 1/4 क्रीम काढून त्यात आंब्याचा रस घालून पुन्हा 4-5 मिनिटे फेटून घेणे.

  4. 4

    काचेचे ग्लास घेऊन त्यात थोडेसे आंब्याचे बारीक तुकडे घालून घेणे. व्हिपिंग क्रिमची बॅग किंवा दुधाची रिकामी पिशवी घेऊन त्यात एका पिशवीत व्हाईट क्रिम व दुसऱ्या पिशवीत मँगो क्रिम घालून घेणे.

  5. 5

    आधी ग्लासात व्हाईट क्रिम घालून घेणे. नंतर मँगो क्रिम. परत व्हाईट, परत मँगो क्रिम घालून घेणे. वरून आंब्यांच्या फोडी घालून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes