तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#cpm3
तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......
सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीआंबेमोहोर तांदुळ
  2. 1 लीटरदुध
  3. 1 चमचावेलची पुड
  4. 1.5 वाटी साखर
  5. काजु
  6. बदामचे काप
  7. चारोळी
  8. तुप आवश्यकतेनुसार
  9. 2 चमचेमिल्कमेड

कुकिंग सूचना

25मिनीट
  1. 1

    प्रथम तांदुळ धुवुन मलमलच्या कपड्यावर पसरुन कोरडे करुन घ्यावे.

  2. 2

    मग मिक्सरमधुन जाडसर वाटुन घ्यावे.नंतर तुपात थोडे परतुन घ्यावे.

  3. 3

    मग दुध उकळवुन घ्यावे.दुध उकळले की त्यात तांदुळ घालुन सतत चमचा हलवत ठेवुन शिजवुन घ्यावे.मिल्कमेड घालावे.

  4. 4

    दुध आणि तांदुळ शिजुन छान एकजीव झाले की या मधे साखर घालावी.साखर विरघळली की वेलची पुड,चारोळी,काजुबदाम घालावे.

  5. 5

    थोडे हलवत राहावे.पाच मिनीटानी खीर तयार.तांदुळामुळे खीर दाट होते त्यामुळे दुध जास्त आटवण्याची गरज नाही.

  6. 6

    आता हि स्वादिष्ट तांदळाची खीर सर्व्ह करावी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes