तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

तांदळाच्या खिरीची लज्जत काही वेगळीच असते. सगळं प्रमाण नीट जुळून आलं, तर तांदळाची खीर एकदम चविष्ट होते.ही सोपी खीर सर्वात लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे.खीर ही जगातील सर्वात मोठी तांदळाची खीर आहे, भारत, मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन स्वयंपाकाची परंपरा एकत्र करणारी आंतरराष्ट्रीय मिष्टान्न आहे

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

तांदळाच्या खिरीची लज्जत काही वेगळीच असते. सगळं प्रमाण नीट जुळून आलं, तर तांदळाची खीर एकदम चविष्ट होते.ही सोपी खीर सर्वात लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे.खीर ही जगातील सर्वात मोठी तांदळाची खीर आहे, भारत, मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन स्वयंपाकाची परंपरा एकत्र करणारी आंतरराष्ट्रीय मिष्टान्न आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरघट्ट सायीचे दूध (फुल्ल क्रीम दूध / म्हशीचे)
  2. 1/2 कप = १२५ ग्रॅम्स बारीक दाण्याचा तांदूळ (आंबेमोहोर, किंवा इंद्रायणी किंवा बासमती तुकडा)
  3. 3/4 कप = १८० ग्रॅम्स साखर (अधिक गोड आवडत असल्यास साखर थोडी वाढवली तरी चालेल)
  4. 1 टेबलस्पूनमनुका
  5. 1 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  6. 1 टेबलस्पूनबदाम
  7. 2 टेबलस्पूनचारोळी
  8. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  9. 1/4 टीस्पूनजायफळ
  10. तूप

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    कृती:
    तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन एका चाळणीत किमान ३० मिनिटे निथळत ठेवावेत.नंतर पाणी निघून गेले की मिक्सरमधून फक्त १० सेकंद फिरवून त्याची जाडसर पावडर करून घ्यावी. खलबत्त्यात किंवा पाट्यावर रवाळ वाटले तर उत्तमच!

  2. 2

    एका मोठ्या जाड बुडाच्या कढईत १ लिटर दूध तापवत ठेवावे. दुधाला उकळी आली की आच मंद करावी, आणि एकदा तळापासून दूध ढवळून घ्यावे आता वाटलेले तांदूळ घालून लगेचच ढवळावे म्हणजे तांदळाच्या गुठळ्या पडणार नाहीत.

  3. 3

    मंद आचेवर तांदूळ दुधात शिजवून घ्यावेत. मधून मधून दूध ढवळत राहावे आणि कढईच्या कडांना लागलेली साय दुधात घालावी म्हणजे खीर चांगली दाट होते.

  4. 4

    खीर शिजतेय तोवर बाजूला एका छोट्या पॅनमध्ये १-२ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात चारोळ्या, काजू आणि मनुका एकामागोमाग एक परतून घ्याव्यात. चारोळ्या आणि काजू खरपूस होई पर्यंत आणि मनुका फुलेपर्यंत परताव्यात, खूपच स्वादिष्ट लागतात!

  5. 5

    साधारण १२ मिनिटांत खीर चांगली दाट होते, आता त्यात साखर घालून ढवळून घेऊ. साखर घातल्यावर थोडे पाणी सुटते. ते आठवायला अजून अजून ७-८ मिनिटे खीर मंद आचेवर शिजवून घेऊ.आता सरतेशेवटी तुपात परतलेला सुका मेवा, वेलची पावडर, व जायफळ पावडर घालून नीट ढवळून घेऊ. खीर तयार आहे. गॅस बंद करून झाकण घालून ठेवू. ही खीर हलकी गरम असताना किंवा फ्रिजमध्ये थंड करून सुद्धा खायला खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes