ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम...
ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम...
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी. ब्रेडचा कडा काढून घ्यावी. त्याचे तुकडे करून घ्यावे. मिक्सर चे भांड्यात टाकावे.
- 2
बारीक केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून, आता त्यात मिल्क पावडर आणि वेलची पूड टाकून मिक्स करून घ्यावे. नंतर अगदी थोडे थोडे दूध टाकून भिजवून घ्यावे. आणि दहा मिनिट झाकून बाजूला ठेवावे.
- 3
तोपर्यंत एका भांड्यात साखर घेवून त्यात पाणी टाकून त्याचा पाक करून घ्यावा. साधारण 4-5 मिनिटात पाक होतो. खूप घट्ट नको पाक.
- 4
आता पुन्हा एकदा ब्रेड मळून घ्यावी. त्याचे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे. एक गोळा घेवून त्यात फोटोत दाखविल्याप्रमाणे मधे किसमिस टाकावा.
- 5
त्याला बंद करून छान गोळा करून घ्यावा. क्रॅक्स यायला नको. अशाप्रकारे सर्व गोळे करून घ्यावे. गोळे होईपर्यंत एका बाजूला गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे. त्यानंतर मध्यम आचेवर ब्रेडचे गोळे तळून घ्यावेत.
- 6
छान सोनेरी रंगावर तळून, ते काढून किचन पेपरवर काढून घ्यावे. लगेचच गरम गोळे गरम असलेल्या पाकात टाकावे.
- 7
2-3, मिनिट उकळून घ्यावे. म्हणजे पाक चांगल्या रीतीने गुलाबजाम मध्ये जाईल. अशा रीतीने, ब्रेडचे झटपट गुलाबजाम खाण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi -
ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. Amrapali Yerekar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
-
रताळ्याचे गुलाबजाम (ratlyahce gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week11#sweetpotatoगुलाबजम म्हणजे सगळ्यांना आवडणारे...पण हे गुलाबजाम केले आहेत खास रताळ्यापासुन.....एकदम soft आणि spongy...खुपच टेस्टी....करून बघा खुप सोप्या पद्धतीने मी केले आहेत,झटपट होतात आणि उपासाला तुम्ही एक डेझर्ट म्हणून देऊ शकता.रताळे खरच खुप पौष्टीक कंदमुळ आहे.याचा आपल्या आहारात समावेश हवाच. पझल मधून sweet potato म्हणजे रताळे हा clue ओळखुन हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#CDY ज्या प्रमाणे, सर्वांना गुलाबजाम आवडतात, तसेच माझ्या मुलांना हमखास आवडणारा हा पदार्थ.. या वेळी माझ्या मुलाने तर, कधी, नुसतेच गुलाबजाम, तर कधी गुलाबजाम श्रीखंड, तर कधी गुलाबजाम रबडी, असे variation करून खाल्लेत.. Varsha Ingole Bele -
-
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत..... दहा बारा वर्षांपूर्वी चा एक किस्सा शेअर करावासा वाटला. नाशिकला माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते.छान मोठ्ठे लॉन बुक केले होते.लग्नाची तारीख ४ मे होती. सगळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होईल का असे वाटत होते.पण घडले भलतेच.भर मे महिन्यात जसे लग्न लागले तशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली.नवरी, नवरदेव भिजू नयेत म्हणून छत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला.वऱ्हाड आडोशाला उभे राहून सोहळा पहात होते.१५-२० मिनिटात पाऊस पूर्ण थांबला.मग जेवणाची लगबग...मेन्यू नेहमीचाच होता...स्वीट डिश मध्ये गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस क्रीम होतं. बऱ्याचशा नातेवाईकांनी बाउल मध्ये गुलाबजाम घेऊन त्यावर मस्त आइस्क्रीम घालून त्याचीही मजा घेतली.तेव्हापासून गुलाबजाम विथ आईस क्रीम ही डिश कायम लक्षात राहिली.आणि अर्थातच अवकाळी पडलेला पाऊसही..... Preeti V. Salvi -
खव्याचे गुलाबजाम (khawa gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम म्हणले कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जास्त आवडतात. लगेच बनणारी ही स्वीट डिश आहे प्रत्येक प्रोग्राम मध्ये स्वीट मेनू शक्यतो गुलाबजाम असतोच. मला कालच ऑर्डर होती ओटीभरणाची मग मी गुलाबजाम केले. बघूया रेसिपि. दिपाली महामुनी -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5 गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी Ashwini Muthal Bhosale -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
-
इन्स्टंट ब्रेड गुलाब जामून (instant bread gulab jamun recipe in marathi)
#GA4#week18#गुलाबजामून#इन्स्टंटब्रेडगुलाबजामूनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गुलाब जामुन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. गुलाब जामुन सगळ्यांचा प्रिय असा त्याचं नावतच प्रेम आहे तसाच तो गुलाब जामुन गोड असा सगळेच याच्या प्रेमात पडणारे कधीच नाही म्हणणारे प्रत्येक समारंभात गुलाबजामुन ची बहार असते, कार्यक्रम समारंभ कोणताही असो छोटा-मोठा याला मान नक्की असतो. क्वचितच असा कोणी मिळेल की त्याला गुलाबजामुन नाही आवडत कितीही कोणी आग्रह करत करत सरळ तोंडात जातोच तोंड गोड करूनच राहतो. असा हा सगळ्यांचा लाडका गुलाबजामून आज मी बनवला वेळ कमी असल्यामुळे इन्स्टंट पद्धतीचा बनवला, माव्याचा, रव्याचा, मिल्क पावडर, मैदा बऱ्याच वस्तूंपासून , गुलाब जामुन बनवला जातो काळा जाम, सुखा जाम, पाकातला जाम ,साखर लावून केलेला जाम, असे बरेच प्रकार गुलाब जामुन चे प्रकार बघायला मिळतात. मी आज ब्रेड पासून इन्स्टंट कमी वेळात बनणारा गुलाब जामुन बनवला आहे. सोपी साधी अशी रेसिपी आहे. आरामात सगळे घटक अवेलेबल असतातकधी अचानक घाईगडबडीत करायचे असले तर पटकन होतात 'गुलाब जामून मलाही जाम आवडतो'😊 Chetana Bhojak -
शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
#गुलाबजाम #शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम.... मी रेडिमेट गुलाबजाम चे प्रिमिक्स वापरून आज गुलाबजाम बनवले हे अतिशय सुंदर आणि न बिघडता छान बनतात आणि मी जे प्रिमिक्स वापरलं ते चितळे यांच वापरल..... मला आणि घरी सगळ्यांनाच चितळेंचे गुलाबजाम प्रिमीक्स चेच गुलाबजाम फार आवडते ....आणि ते करायला पण सोपी पडतात...... आणि झटपट नं बिघडता होतात .... Varsha Deshpande -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम हे सगळ्यांचेच आवडते पक्वान्न आहे.सण असो,लग्न-मुंज असो की वाढदिवस गुलाबजाम म्हणजे सगळे खूश! खव्यापासून तयार होणारे हे पक्वान्न एकदम शाही!मिट्ट गोड खाणाऱ्यांना एक मेजवानीच म्हणावी लागेल.गुलाबजाम करणे तसे हातोटीचेच काम.म्हणजे नुसत्या खव्यापासून करता येत नसल्याने बाईंडींगसाठी बारीक रवा किंवा मैदा घालणं ही यातली महत्वाची पायरी.तो योग्य प्रमाणात असणं हे पण महत्वाचेच!रवा/मैदा जास्त झाल्यास एकतर दडस(घट्ट)तरी होतात आणि कमी झाल्यास गरम तेलात विरघळतात.खवा कधी खूप घट्ट असेल तर रवा/मैद्याचे प्रमाण कमी केले तरी चालते.पण खासकरुन गुलाबजामाचा खवा वेगळा मिळतो,तो घेतल्यास घरीही उत्तम गुलाबजाम बनतात.खव्याशिवाय रव्याचे,दूधपावडरीचे आणि रेडीमेड इंन्स्टंट मिक्सचेही गुलाबजाम करता येतात. पण खव्याचे आणि घरी केलेले गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच.पनीर आणि खव्याचे गुलाबजाम ही सुंदर लागतात.लहानपणी अगदी गोल गोल छान पाकात मुरलेले गुलाबजाम हलवायाच्या काउंटरवरच्या काचेच्या बरणीत दिसायचे शाळेतून येताजाता....तोंपासू😋अगदी पहिल्यांदा घरी मी जेव्हा गुलाबजाम केले तेव्हा अक्षरशः धडधडत होते की तळताना विरघळतायत की काय...पण चुकतमाकत शिकले.आता माझ्या स्वतःच्या डिझाइन केलेल्या ह्या रेसिपीचे घरातले सगळेच चाहते आहेत...बघा,तुम्हीही करुन...आवडतील नक्कीच!👍😋😋 Sushama Y. Kulkarni
More Recipes
टिप्पण्या