रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

70_80 मिनिट
  1. 175 ग्रॅम (1 कप)रवा
  2. 40 ग्रॅममिल्क पावडर
  3. 1 कपसाखर
  4. 1/4 टीस्पूनवेलची पुड
  5. 1-1/2 कपदुध
  6. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

70_80 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. पॅन मध्ये साखर घालून 1कप पाणी घाला उकळी आल्यावर वेलची पुड घाला. आता पाक दोन ते तीन मिनिट उकळून घ्या गॅस बंद करा.

  2. 2

    आता कढईत दुध घालून उकळी काढा आता त्यात एका हाताने रवा घाला व दुसय्रा हाताने ढवळत रहा म्हणजे गुठळ्या हाणार नाहीत.मिल्क पावडर घालून चिंगले एकजीव करून घ्या.

  3. 3

    आता पाच मिनिट कढईवर झाकण ठेवून लो मिडीयम फ्लेमवर वाफवून घ्या.गरमागरम ताटात काढून रवा चांगले मळून घ्या गोळा मऊसूत व्हायला हवा.

  4. 4

    आता छोटे छोटे गोळे करून घ्या व गुलाबजाम वळून घ्या. वळताना गोळा व गुलाबजाम कपड्याने झाका कोरडे व्हायला नको म्हणून.

  5. 5

    कढईत तेल घालून गरम करा लो फ्लेमवर. तेल जास्त गरम नको एका वेळी 7_8 गुलाबजाम कढईत टाका म्हणजे तेलाचे टेंप्रेचर मेंटेन राहील.(गुलाबजाम कढईत टाकल्यावर हळू हळू बुडबुडे नीघायला हवे इतपत तेल गरम करा)

  6. 6

    असे सगळे गुलाबजाम तळून घ्या. आता पाक गरम करा व त्यात गुलाबजाम घाला.7_8 तास पाकात मूरू द्या.मुरल्यावर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes