हिरवे मूग चणे टिक्की (hirve moong chana tikki recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#kdr

# कडधान्य_रेसिपी

#हिरवेमूग_चणे_टिक्की...😋

वरणभात,आमटीभात,पोळीभाजी, चटण्या,कोशिंबीरी एवढेच कडधान्यांच्या उसळी,आणि कडधान्यांपासून बनणारे पदार्थांचे आपल्या रोजच्या आहारात तितकेच महत्त्व आहे..किंबहुना प्रोटीन्स, फायबर्स,मोड आणले तर Vit.C यांची प्रमुख स्त्रोत आहेत ही कडधान्ये..त्यामुळे वेगवेगळ्या variations च्या रुपात ही कडधान्ये आपल्या रोजच्या आहारात वापरणे must च...चला तर मग चमचमीत चटपटीत टिक्की पाहू या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनीटे
4 जणांना
  1. 1 कपहिरवे मूग
  2. 1/2 कपचणे
  3. 1/4 कपचणाडाळ
  4. 3मध्यम उकडलेले बटाटे
  5. 1/2 कपपोहे बारीक दळून
  6. 2-3 टेबलस्पूनआलं मिरची लसूण पेस्ट आवडीनुसार
  7. 2 टीस्पून धणे पूड
  8. 1 टीस्पूनजीरे पावडर
  9. 1लिंबाचा रस
  10. 2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनचाट मसाला कमी अधिक आवडीनुसार
  12. मीठ चवीनुसार
  13. तळण्यासाठी तेल
  14. 4-5मिरचीचे बारीक तुकडे

कुकिंग सूचना

30-35 मिनीटे
  1. 1

    प्रथम हिरवे मूग,चणे स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजवून नंतर त्याला मोड आणा..चणाडाळ 4-5 तास भिजत ठेवा..बटाटे उकडून स्मँश करुन घ्या.आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्या.साहित्य जमा करा.

  2. 2

    पोहे मिक्सरवर बारीक करा.नंतर मिक्सरवर मूग,चणे,चणाडाळ किंचीत पाणी घालून वाटून घ्या..नंतर एका वाडग्यात हे मिश्रण,उकडलेले बटाटे,पोहे पावडर,सगळे मसाले, मिरची तुकडे,कोथिंबीर, लिंबू रस,मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा..आणि या मिश्रणाच्या टिक्क्या करुन घ्या.

  3. 3

    तयार झालेल्या टिक्क्या मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत..

  4. 4

    तयार झाल्या आपल्या चमचमीत चटपटीत टिक्क्या... एका डिशमध्ये गरमागरम तयार टिक्क्या सॉस,हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes