गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm5 week - 5
#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.
चवीला खूप छान लागत होते.

गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)

#cpm5 week - 5
#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.
चवीला खूप छान लागत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिटे
14-15 पीस
  1. 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपमिल्क पावडर
  3. 1 कपसाखर
  4. 1.5 कपपाणी
  5. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  8. 4-5केशर काडया
  9. 7 टेबलस्पूनदूध

कुकिंग सूचना

35-40 मिनिटे
  1. 1

    एका वाटी मध्ये चाळणीत गव्हाचे पीठ, मिल्क पावडर, बेकिंग सोडा घालून चाळून घेणे. काही घाण असेल तर निघून जाते.

  2. 2

    त्यात तूप घालून चांगले मिक्स करून घेणे. पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजे तूपाचे प्रमाण बरोबर आहे. लागल्यास तूप घालावे.

  3. 3

    दूध गरम करून, थंड केलेले असावे. एकेक चमचा दूध घालत पिठ चपातीच्या कणकेपेक्षा थोडे मऊ मळून घेणे.तूप लावून पुन्हा एकदा हाताने चांगले मळून घेणे.हव्या त्या आकाराचे गुलाबजाम तयार करून घेणे.

  4. 4

    गुलाबजाम तेलात किंवा तुपात मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत.तळताना चमच्याने सतत हलवत राहावे म्हणजे सर्व बाजूंनी छान तळले जातात. सर्व गुलाबजाम तळून घ्यावेत.

  5. 5

    एका पातेल्यात साखर व पाणी घालून चिकट पाक करून घ्यावा. *1-2 तारी पाक करायचा नाही. वेलची पावडर व केशर काडया घालून घेणे.

  6. 6

    पाक तयार झालावर, तयार गुलाबजाम त्यात घालून 1-2 मिनिटे झाकण ठेवून उकळवून घेणे. गॅस बंद करावा. 3-4 तास मुरण्यास ठेवून द्यावे. गुलाबजाम आकाराने मोठे झालेले दिसतात.

  7. 7

    खाण्यासाठी तयार गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes