बटाटा वडा (batata vada recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा‌.😊

बटाटा वडा (batata vada recipe in marathi)

कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा‌.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ ते ३० मि.
४ जणांसाठी
  1. 4-5 उकडलेले बटाटे
  2. 1+1/2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  3. कोथिंबीर बारीक चिरून
  4. 1 टीस्पूनहळद
  5. जीरे ,मोहरी, कडिपत्ता,हिंग
  6. 1+1/2 कप बेसन
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी गरजेनुसार
  9. 1 टेबलस्पूनतांदळाचं पीठ
  10. तेल

कुकिंग सूचना

२५ ते ३० मि.
  1. 1

    बटाटे उकडून घ्या. पॅनमधे फोडणीपूरता तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग आलं लसूण पेस्ट छान खमंग परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात हळद,उकडलेले बटाटे हातानेच थोडे कुस्करून घाला. भाजी छान ५ मि. परतून घ्या. व वरुन कोथिंबीर घालून मिक्स करून भाजी थंड करून घ्या‌.

  3. 3

    बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, चिमूटभर हळद, मीठ, गरजेनुसार पाणी घालून थोडे घट्टसर बॅटर तयार करा.

  4. 4

    तयार भाजीचे गोळे करून घ्या.

  5. 5

    कढईत तेल गरम करायला ठेवा.तयार गोळे बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून मध्यम आचेवर तळून घ्या. मस्त गरमागरम वडे चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes