साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#cpm6
#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात.

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#cpm6
#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसाबुदाणा
  2. 1/2 कपदाण्याचे कुट
  3. 1मोठा बटाटा
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. 3-4कढीपत्ता (खात असाल तर)
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 2/3 टेबलस्पूनतुप
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर (खात असाल तर)
  11. 2-3 टेबलस्पूनओले खोबरे
  12. 1लिंबू

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    साबुदाणा दोन पाण्यात स्वच्छ धुवून थोडे वर पाणी ठेवून भिजत घालावे.

  2. 2

    सकाळी जर वाटले तर अगदी थोडे पाणी शिंपडावे.बटाटा उकडून घ्या. शेंगदाणे कुट, मीठ, साखर साबुदाण्यामधे मिसळून घ्या.

  3. 3

    कढईत तुप तापत ठेवा तापले कि जीरे घाला जीरे फुलले की मिरच्या घालाव्यात,कढीपत्ता घाला नंतर वरील साबुदाण्याचे मिश्रण घाला नि छान परता,बटाटे घाला नि परत परता व नंतर झाकण ठेवून दणदणीत वाफ येऊ द्या.

  4. 4

    साबुदाणा खिचडी तयार आहे खोबरे नि कोथिंबीर घाला लिंबू पिळून मस्त खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes