श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cook_along

#cna

#Cooksnap_july

#श्रावणी घेवडा बटाटा भाजी...

माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️

घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..
श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका

**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।
वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्‍टादशाध्यायांत ॥३६॥ **
असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..

लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4जणांना
  1. 250 ग्रॅमश्रावणघेवडा
  2. 2मध्यम बटाटे
  3. 1.5 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनगोडा मसाला
  5. 1/2 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पून गुळ कमी-जास्त आवडीनुसार
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  8. 1 टेबलस्पूनओले खोबरे
  9. भरपूर कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. फोडणीसाठी
  12. तेल
  13. मोहरी
  14. जीरे
  15. हिंग
  16. हळद
  17. 1 इंचआल्याचे तुकडे

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    प्रथम घेवडा स्वच्छ धुवून घ्यावा. आणि व्यवस्थित निवडून घ्यावा शेंगांची सगळ्या रेषा व्यवस्थित काढून घ्यावा.

  2. 2

    आता एका कढईत किंवा प्रेशर पॅनमध्ये तेल घाला तेल गरम झाले की त्यामध्ये जीरे मोहरी हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या यामध्ये थोडे आल्याचे तुकडे घाला कोथिंबीर घाला आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्या

  3. 3

    आता फोडणीवर बटाटे घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.. नंतर घेवड्याच्या शेंगा घाला आणि व्यवस्थित परत परतून घ्या आता यामध्ये तिखट गोडा मसाला धने पावडर ओले खोबरे गूळ शेंगदाणा कूट चवीनुसार मीठ घालून भाजी छान मिक्स करा. आता या भाजीत गरजेनुसार पाणी घालून भाजी छान शिजवून घ्या.

  4. 4

    तयार झालेली भाजी वरून खोबरं कोथिंबीर घालून नैवेद्याच्या पानात वाढून देवाला नैवेद्य दाखवा आणि सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes