दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#ccs
घेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा

दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

#ccs
घेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमश्रावणी घेवडा
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनगूळ
  6. 2 टीस्पूनकिसलेलं खोबरं
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट मसाला
  8. 1 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीसाठी
  12. तेल, हिंग, मोहरी, जिरं, हळद, कढीपत्ता

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    श्रावणी घेवड्याच्या शेंगा स्वछ धुवून घ्या. मग हाताने खुडून घ्या. शेंगा हाताने खुडलेल्या भाजीची चव चांगली लागते. शेंगा खुडताना जवळ जवळ तुकडे करायचे आणि दोन्ही बाजूने तंतू / रेषा खेचून काढायच्या. कांदा, मिरच्या, बटाटा चिरून घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ताची फोडणी द्यावी. त्यात मिरची आणि कांदा परतून घ्या. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. बटाटा घालून ढवळून दोन मिनिटे झाकून ठेवा. मग शेंगांचे तुकडे घालावे.

  3. 3

    थोडासा पाण्याचा हबका मारा आणि झाकून दहा मिनिटांसाठी भाजी शिजायला ठेवा. मध्येच एकदा तळाला लागू नये म्हणून ढवळून घ्या.

  4. 4

    दहा मिनिटांनी भाजी बऱ्यापैकी आवळलेली दिसेल. यात गूळ, खोबरं, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालून ढवळा. पुन्हा झाकून शिजायला ठेवा. साधारणतः अजून पाच मिनिटांत भाजी व्यवस्थित शिजलेली असेल. एक चमचा खोबरं व कोथिंबीर वरून भुरभुरवून घेवडा भाजी सर्व्ह करा.

  5. 5

    या पद्धतीने बनवलेली भाजी अत्यंत चविष्ट लागते. साधारणपणे घेवडा भाजी शक्यतो कोणाला खायला फारशी आवडत नाही, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते.
    -शितल मुरांजन

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes