मोगरा मोदक (mogra modak recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#gur
गणपती बाप्पा साठी मोगरा मोदक.

मोगरा मोदक (mogra modak recipe in marathi)

#gur
गणपती बाप्पा साठी मोगरा मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. उकडीचे साहित्य -
  2. 1 कपतांदूळ पीठ
  3. 1 टीस्पून मैदा
  4. 1 टीस्पून तेल
  5. 1 चिमुटभरमीठ
  6. हिरवा फुड कलर /कोथिंबीरीचा देठ
  7. सारण साहित्य -
  8. 1 कपनारळाचा चव
  9. 3/4 कपगुळ
  10. 2 टीस्पून भाजलेली खसखस
  11. 1/2 टीस्पून जायफळ पूड
  12. 1 टीस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    एका कढईत खसखस भाजून त्यात खोबऱ्याचा चव व गुळ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात जायफळ पूड घालून परतून घ्यावे.

  2. 2

    तांदूळ पीठ व मैदा चाळून घ्यावा. एका भांड्यात 1 कप पाणी घालून त्यात मीठ व तेल घालून एक उकळी आणून त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करावे व 2 मि. झाकून ठेवावे. आता गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट करावे.

  3. 3

    आता थोडी उकड घेऊन चांगली मळावी. मळताना त्यात आवश्यक ते फुड कलर घालून मळावे.सारणाचे अगदी छोटे गोळे करावे.

  4. 4

    आता उकडीचा अगदी छोटा गोळा घेऊन त्याची पातळ आशी हाताने वाटी करून त्यात सारण भरून ती मोदका प्रमाणे पाकळी न पडता बंद करावी.हिरव्या उकडीचे देठ करावे.

  5. 5

    आता कळीला हलके छिद्र पाडून त्यात उकडीचा हिरवा देठ रोवावा.स्टिमर मधे पाणी घालून त्यावर चाळणी ठेऊन त्यात तयार मोदक व पाने ठेऊन 15 मि. वाफवून घ्यावे.

  6. 6

    देठाला दुसरा पर्याय म्हणजे कळ्या वाफवल्यावर कोथिंबीरीची काडी रोवावी.

  7. 7

    मोगरा मोदकावर साजूक तूप घालून गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes